Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Mid-Term Elections: वर्षभरात मध्यावधी निवडणुका, माजी मुख्यमंत्र्यांचं भाकित

11

रायपूर: लोकसभा निवडणुकामध्ये देशाने एनडीएला पूर्ण बहुमत दिलं असून आता नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. एनडीएच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत त्यांची एकमताने पंतप्रधानपदी निवड करण्यात आली. नरेंद्र मोदी हे ९ जूनला सायंकाळी ६ वाजता पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यादरम्यान, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या विधानाने संपूर्ण राजकारणात खळबळ माजवली आहे. ते म्हणाले की येत्या वर्षभरात देशात मध्यावधी निवडणुका होऊ शकतात.

६ महिने ते वर्षभरात मध्यावधी निवडणुका – भूपेश बघेल

“कार्यकर्त्यांनी तयार राहावे. येत्या ६ महिने ते १ वर्षात मध्यावधी निवडणुका होऊ शकतात. देवेंद्र फडणवीस राजीनामा देत आहेत, योगींची खुर्चीला हादरा बसला आहे. भजनलाल शर्माही डगमगले आहेत. अद्याप सरकार स्थापन झाले नाही पण जेडीयूचे प्रवक्ते अग्निवीर योजना रद्द करणे आणि जात जनगणनेबाबत बोलत आहेत. हे सर्व ते मुद्दे आहेत जे राहुल गांधींनी उचलून धरले.

भूपेश बघेल यांनी राजनांदगाव लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती, परंतु भाजपच्या संतोष पांडे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. छत्तीसगडमध्ये ११ पैकी १० जागांवर भाजपने विजय मिळवला, तर काँग्रेसला फक्त एक जागा जिंकता आली.

बघेल यांनी मोदींच्या पोशाखाची खिल्ली उडवली आहे. “जे दिवसातून तीन वेळा कपडे बदलायचे ते आता एकाच कपड्यात तीन कार्यक्रम करत आहेत. त्यांना आता कपडे बदलणे, खाणे-पिणे हे सूचत नाहीये.”

छत्तीसगडमध्ये काँग्रेसला मोठा झटका

लोकसभा निवडणूक ही भूपेश बघेल यांच्यासह अनेक दिग्गजांसाठी खूप कठीण ठरली. छत्तीसगडमध्ये काँग्रेसने तीन आमदार आणि दोन माजी मंत्र्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. पण, त्या सर्वांना पराभवाचा सामना करावा लागला.

छत्तीसगडमध्ये काँग्रेसला केवळ कोरबा लोकसभा जागा जिंकता आली. या मतदारसंघातून विरोधी पक्षनेते चरणदास महंत यांच्या पत्नी ज्योत्सना महंत यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे. त्यांनी निवडणुकीत भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सरोज पांडे यांचा पराभव केला.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.