Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

athawale at chipi airport: रामदास आठवलेंनी चिपी विमानतळावरून उडवले कवितेचे विमान

18

हायलाइट्स:

  • चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची उपस्थिती.
  • कविता करत जिंकली उपस्थितांची मनं.
  • विमानतळाचे श्रेय अनेकांचे- रामदास आठवले.

सिंधुदुर्ग: ‘सिंधुदुर्गच्या विकासाची मजबूत होणार आहे कमान, कारण चिपीमध्ये आले आहे मुंबईवरून विमान’ अशी कविता करत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी चिपी विमानतळाचे (Chipi Airport) श्रेय सर्वांचे असल्याचा निर्वाळा दिला. राजकारण बाजूला ठेवून आपण सगळे येथे जमलेलो असून सगळीकडेच राजकारण आणण्याची आवश्यकता नसल्याचेही आठवले म्हणाले. (union minister ramdas athawale has said that the credit for chipi airport belongs to everyone)

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मला या कार्यक्रमाला येण्याचा आग्रह केला. त्यामुळे मी या कार्यक्रमाला आल्याचे आठवले यांनी सांगितले. सिंधुदुर्गसारख्या जिल्ह्याला समुद्र लाभला आहे, सुंदर डोंगर आहेत तसेच झाडेही आहेत. विमानतळाच्या माध्यमातून येथील नागरिकांना नक्कीच रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे आठवले म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा- ‘सिंधुदुर्गच्या विकासाचे कारण नारायण राणे आहे, दुसऱ्याचे नाव येऊ शकत नाही’

‘मला आठवले महायुतीचे गाणे’

राजकीय विरोधक असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला एकाच व्यासपीठावर एकत्र आले. त्यांचे एकत्र येणे रामदास आठवले यांनी अधोरेखित केले. त्यावर ही आपल्या कवितेच्या शैलीत आठवले यांनी भाष्य केले. ते म्हणाले,

‘एकत्र आले आहेत ठाकरे आणि राणे,
मला आठवले महायुतीचे गाणे’

क्लिक करा आणि वाचा- आर्यन खान तुरुंगात बराक क्रमांक १ मध्ये; बाहेरचे अन्न घेता येणार नाही

चीपी विमानतळाच्या विकासाचे श्रेय अनेकांचे- आठवले

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी माझे काही वैर नसल्याचे म्हटले आहे. या विमानतळासाठी अनेकांनी प्रयत्न केलेले आहेत. या विमानतळासाठी नारायण राणे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि मी सुद्धा प्रयत्न केलेल आहेत, असे आठवले म्हणाले. या विमानतळामुळे सिंधुदुर्गच्या विकासाला चालना मिळणार आहे, असे सांगतानाच माझ्या केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे मी सिंधुदुर्गातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करीन असे आश्वासनही आठवले यांनी दिले आणि या कार्यक्रमाला येण्याची संधी मिळण्यावरही एक कविता करत उपस्थितांची मने जिंकली. आठवले म्हणाले,

‘सिंधुदुर्गात आली आहे विकासाची आंधी
म्हणून मला इथे येण्याची मिळाली संधी’

क्लिक करा आणि वाचा- आर्यन खानला मोठा धक्का; कोर्टाने जामीन नाकारला, तुरुंगात रवानगी

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.