Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Lok Sabha Election 2024 : हरियाणात आमचा पराभव करण्यासाठी कॉंग्रेसने डाव आखला, आपचा कॉंग्रेसवर आरोप..
आम्हाला संपवण्याचा प्रयत्न
हरियाणातील पराभवाबाबत आपचे नेते अनुराग धांडा यांनी पत्रकार परिषद घेत कॉंग्रेस वर टीका केली आहे. ते म्हणाले की, आम आदमी पार्टीने दिल्ली आणि हरियाणामध्ये काँग्रेससोबत आघाडी करून निवडणूक लढवली होती. हरियाणातील दहा जागांपैकी ‘आप’ने केवळ कुरुक्षेत्राची जागा जिंकली तर काँग्रेसने पाच जागा जिंकल्या. हरियाणाच्या राजकारणात नवसंजीवनी देणाऱ्या आम आदमी पक्षाचे वर्चस्व काही शक्तींनी संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला.”असे म्हणत कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे.
आप ने कॉंग्रेसला विचारले प्रश्न
१) कैथलमध्ये रणदीप सुरजेवालासारख्या बड्या आणि ताकदवान नेत्याच्या मतदार संघात आमची युती १७ हजार मतांनी मागे कशी पडली?
२) माजी मंत्री आणि काँग्रेस नेते अशोक अरोरा हे हुड्डाजींचे उजवे हात मानले जातात. मग त्यांच्या भागात इंडिया आघाडीचा १८ हजार मतांनी पराभव झाला. हा कसला योगायोग?
३) जेथे काँग्रेसचे आमदार आणि तगडे नेते होते, तिथे आमचा पराभव झाला, आणि जिथे काँग्रेसचे आमदार नव्हते तेथे आपचे कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन आमचे उमेदवार निवडून आले. हा योगायोग समजायचा का?
दरम्यान, आपल्याला माहीत आहे की, पंजाबमध्ये आपचे सरकार आहे. त्याच पंजाबमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसचा ७ जागांवर विजय झाला असून आप ला फक्त ३ जागांवर विजय मिळवता आला आहे. तर हरियाणात १० पैकी फक्त एका जागेवर आपचा विजय झाला आहे. त्यामुळे झालेल्या पराभवाबाबत आप च्या मनात शंका निर्माण झाल्या असून त्यांनी थेट कॉंग्रेसवर आरोप केले आहेत. त्यामुळे आता इंडिया आघाडीत बिघाडी होते कि काय ? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.