Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

यवतमाळ मध्ये बोगस कपाशी बियाणे विक्रीचा पर्दाफाश…

10


महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा

यवतमाळ मध्ये बोगस कपाशी बियाणे विक्रीचा पर्दाफाश…

यवतमाळ (प्रतिनिधी) – गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यामध्ये घडलेल्या जबरी चोरी, तसेच वाहनचोरी, अवैध धंदे, घरफोडी या गुन्ह्यांची गंभीर दखल घेऊन, पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक यांनी नमुद गुन्ह्याची लवकरात लवकर उकल करुन, गुन्ह्यातील आरोपीतांचा शोध घेवून, गुन्ह्यामध्ये गेलेला मुद्देमाल हस्तगत करणेबाबत स्थानिक गुन्हे शाखा यांना आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने गस्तीस असताना यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर  प्रतिबंधित असलेली बियाणे विक्रीकरिता यवतमाळ जिल्ह्यात आणण्यात आली होती. संबंधित बियाणे जिल्ह्यात विक्रीकरिता आणल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी व कृषी विभागाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत कपाशी बियाणे व ईतर साहित्य असा एकूण १६ लाख ९० हजारांचा मुद्देमाल हा दारव्हा पोलिस ठाणे हद्दीतून गुन्हे शाखेने जप्त करून संबंधितांवर कारवाई केली आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, (दि.०८जुन) रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकास गोपनीय बातमीदाराकडून खात्रीलायक माहिती मिळाली की, काही इसम एका पांढरे रंगाचे मारुती सुझुकी इरटीका गाडी क्र. एम.एच.०३ सी.बी. ०६८१ वाहनामध्ये भारत सरकारने प्रतिबंधीत केलेले अनाधिकृत कपाशी बियाने विक्री करीता ताब्यात बाळगुण असुन ते स्वतःचे आर्थिक फायदया करीता दारव्हा येथे घेवुन येणार आहेत. अशी माहिती मिळाल्याने पथकाने त्याबाबत वरिष्ठांना अवगत करुन त्यांचे मार्गदर्शनानुसार कृषी विभागाचे अधिकारी व त्यांचेकडील भरारी पथकास सोबत घेवुन माहिती प्रमाणे दारव्हा दिग्रस रोडवरील केरला टायर्स रिमोल्ड समोर सापळा लावुन थांबले असतांना माहिती प्रमाणे एक मारुती सुझुकी इरटीका गाडी क्र.एम.एच.०३ सी.बी. ०६८१ ही दिग्रसकडे रस्त्याने जातांना दिसुन आल्याने पोलीस पथकाने सदर वाहनास थांबवुन वाहनातील इसमांना त्यांची नावे विचारली असता त्यांनी त्यांची नावे १) शिवाजी सिताराम आडे (वय ३५), रा.वनोली ता.महागांव २) नरेंद्र तुळशिराम राठोड (वय २८) रा.सुधाकर नगर ता.महागांव ३) हिरासिंग गणेश राठोड (वय ३२) रा.सुधाकर नगर ता. महागांव, ४) अवधुत मारोती जाधव (वय ३३) रा.पोखरी ता. महागांव, ५) नितीन गोपीचंद पवार (वय ४०) रा.सुधाकर नगर ता.महागांव, ६) मोहन कनिराम राठोड (वय ५५) रा.सुधाकर नगर ता.महागांव असे असल्याचे सांगीतल्याने त्यांचे वाहनाची झडती सोबत असलेले कृषी अधिकारी व त्यांचे भरारी पथकाने घेतली असता बाहनात १) बुलंदी कॉटन हायब्रीड सिड्स चे ७७ पाकीटे, २) एके ४७ कॉटन हायब्रीड सिड्स चे ७१ पाकीटे, ३) एके ५६ कॉटन हायब्रीड सिड्स चे ६२ पाकीटे, ४) त्रिनेत्र अनमोल कॉटन हायब्रीड सिड्स चे ७० पाकीटे, ५) त्रिनेत्र शिवा कॉटन हायब्रीड सिड्स चे ७० पाकीटे, असा एकूण ६,३०,०००/- रु चे भारत सरकारने प्रतिबंधीत केलेले अनाधिकृत कपाशी बियाने मिळुन आल्याने त्यांना सदरचे बियाने कोठुन आणले याबाबत विचारपुस केली असता त्यांनी ते बियाने ७) नरेंद्र मफतलाल पटेल उर्फ मंगलभाई पटेल (वय ३५) रा.भाउपुरा ताडी जि.मैसाना राज्य गुजरात यांचेकडून विक्री करीता आणले असल्याचे सांगीतले आहे. नमुद इसमांकडे अनाधिकृत कपाशी बियाने विक्री करीता बाळगुन असलेले मिळून आल्याने सदरचे बियाने व नमुद इसमांचे ताब्यात असलेले वाहन तसेच त्याचे कडील ०६ मोबाईल फोन असा एकुण १६,९०,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन पो.स्टे. दारव्हा येथे कारवाई नोंद केली आहे.

त्याच प्रमाणे यापुर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाने कृषी विभागाचे सहकार्यातुन पोलीस ठाणे पाटण येथे अप.क्र. ०१७३/२०२४, पो.स्टे. वडकी येथे अप.क्र.२३०/२२०२४, पो.स्टे. शिरपुर येथे ०१६५/२०२४, व पोलीस स्टेशन मारेगांव येथे अपक्र. ०१७६/२०२४ या प्रमाणे चार वेळा गुन्हे नोंद केले आहेत. आज पावेतो दाखल गुन्हयाचे तपासात सदरचे अनाधिकृत बियाने हे गुजरात येथुन विक्री करीता आणले जात असल्याचे दिसुन आले असुन अशा बियान्यांमुळे शेतकऱ्याचे नुकसान होत आहे. यापुढे प्रतिबंधीत व अनाधिकृत वियान्यांची विक्री होवु नये याकरीता सामान्य जनतेस जिल्हा पोलीसांतर्फे आवाहन करण्यात येते असा कोणताही प्रकार आपले परिसरात आढळून आल्यास पोलीस नियंत्रण कक्ष यवतमाळ येथील डायल ११२ किंवा स्था.गु.शा. कडील अधिकारी यांचे ९७६७१०९४४९, ८७८८९५८६९५, ८८८८७९८७७७ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधुन माहिती द्यावी माहिती देणाऱ्याचे नांव गोपणीय ठेवण्यात येईल.

अशा प्रकारे सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक, यवतमाळ डॉ.पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक, पियुष जगताप, आधारसिंग सोनोने, पोलीस निरीक्षक, स्थागुशा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात सपोनि गजानन गजभारे, अमोल मुडे, पोउपनि शरद लोहकरे, पोलीस अंमलदार तेजाब रणखांब, सुभाष जाधव, रमेश राठोड, कुणाल मुंडोकार, योगेश डगवार, सुनिल खंडागळे, सुधीर पिदुरकर, रजनिकांत मडावी, नरेश राउत सर्व स्थागुशा यवतमाळ तसेच राजीव शिंदे, राजेंद्र माळोदे, कल्याण पाटील, पंकज बरडे सर्व कृषी विभाग यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

Leave A Reply

Your email address will not be published.