Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
YouTube नं का डिलीट केला चाहत फतेह अली खान यांच्या ‘Bado Badi’ गाण्याचा व्हिडीओ, इंस्टाग्रामही करणार का कारवाई?
‘बदो बदी’ गाण्याचा व्हिडीओ युट्युबने केला डिलिट
रिपोर्ट्सनुसार चाहत फतेह अली खान यांच्या बदो बदी गाण्याचा व्हिडीओ कॉपीराइट इश्यूमुळे हटवण्यात आला आहे. हे गाणं 1973 मध्ये आलेल्या बनारसी ठग चित्रपटात नूर जहाँ यांनी गायलं होतं. दोन्ही गाण्याचे शब्द सारखेच होते, त्यामुळे चाहत फतेह अली खान यांचा व्हिडीओ हटवण्यात आला.
रिपोर्ट्सनुसार, ओरिजनल कंपोजिशनचे राइट्स असलेल्या नूर जहाँ यांच्या टीमनं कॉपीराइट क्लेम केला असू शकतो. हे गाणं चाहत फतेह अली खान यांच्या युट्युब चॅनेलवर एप्रिल 2024 मध्ये शेयर करण्यात आलं होतं. या गाण्याचा वापर अनेकांनी रील्समध्ये देखील केला आहे.
YouTube व्हिडीओज का डिलिट करते?
YouTube अशाप्रकारे कोणतेही व्हिडीओ डिलीट का करते? असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. YouTube एखाद्या व्हिडीओचा कॉपीराइट इश्यू असल्यास तो डिलीट करू शकते. इतकेच नव्हे तर जर तुम्ही कोणाच्या परवानगी शिवाय त्यांचा फोटो किंवा व्हिडीओ तुमच्या YouTube Video मध्ये वापरला असेल तरी देखील त्या व्हिडीओवर कॉपीराइट क्लेम केला जाऊ शकतो, आणि त्यामुळे व्हिडीओ हटवला जाऊ शकतो.
YouTube च्या नियमावलीनुसार, संवेदनशील कंटेंट, हिंसा किंवा धोकादायक कंटेंट, चुकीची माहिती पसरवणारा व्हिडीओ देखील प्लॅटफॉर्मवरून हटवला जाऊ शकतो. बऱ्याचदा याची पूर्वसूचना चॅनेलच्या मालकाला दिली जाते. त्यानंतर या निर्णयाविरुद्ध अपील करण्याचा पर्याय देखील युट्युबकडून दिला जातो.
पण चाहत फतेह अली खान यांना ही संधी देण्यात आली आहे की नाही ते मात्र स्पष्ट झालं नाही. तसेच जर कॉपीराइटचा इश्यू असेल तर इंस्टाग्राम देखली या गाण्यावर कारवाई करेल की नाही ते देखील पाहावं लागेल.