Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
वर्धा शहरातील कुख्यात गूंड आफताब याचेवर एम.पी. डी. ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही….
वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन वर्धा शहर हद्यीतील कुख्यात गुंड आफताब उर्फ सोहेल उर्फ मोंडा अखील खान, वय 23 वर्षे, रा. स्टेशन फैल, वर्धा याचे विरूध्द भारतीय दंड विधान, हत्यार कायदा, महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदा यासारख्या कायद्यान्वये सन 2016 ते 2024 पावेतो 24 गुन्हयांची नोंद आहे. ज्यामध्ये दुखापत, जबरी चोरी, दरोडा, गृहअतीक्रमण, शासकीय कर्मचारी यांचेवर हमला, गैरकायद्याची
मंडळी जमवून दुखापत करणे यासारखे गंभीर गुन्हे करण्याचे सवयीचा गुन्हेगार आहे. मागील 8 वर्षांमध्ये सदर गुंडाने पो.स्टे. वर्धा शहर, रामनगर, हिंगणघाट परीसरात प्रचंड दहशत निर्माण केली होती.त्यामूळे अनेकजण त्याचेविरूध्द पोलिस तक्रार करण्यास सुध्दा धजावत नव्हते.
त्यामूळे त्याचेविरूध्द तडीपारीची कारवाई सुध्दा करण्यात आली होती. मात्र कार्यवाहीस जुमानत नसल्याचे त्याचे विघातक
कृत्यांना आळा घालण्याकरीता त्यांस महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधीद्रव्ये विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, रेती माफीया व जिवनावश्यक वस्तूचा काळाबाजार करणारे यांचे विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम 1981 (सुधारणा 2015 ) अन्वये स्थानबध्द करण्याचा प्रस्ताव तत्कालीन ठाणेदार धनाजी जळक तसेच रविंद्र शिंदे यांनी तयार केला होता त्याचा पाठपुरावा करुन ठाणेदार पराग पोटे यांनी पोलिस अधिक्षक यांचेमार्फत मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांना सादर करण्यात आला होता. मा. जिल्हादंडाधिकारी, वर्धा यांनी सदर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेवून आफताब उर्फ सोहेल उर्फ मोंडा अखील खान, वय 23 वर्षे, रा. स्टेशन फैल, वर्धा यांचे विरूध्द दिनांक 06.06.2024 रोजी स्थानबध्द आदेश पारीत केला.
सदर आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखा व पो.स्टे. वर्धा शहराचे पथकाने आफताब खान यांस दि(08) रोजी शिताफीने ताब्यात घेवून त्याचेविरूध्द काढण्यात आलेला स्थानबध्द आदेश पंच
व त्याचे नातेवाईक यांचे समक्ष तामील केला. त्यास नागपूर जिल्हा मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथे पुढील एक वर्षाकरीता स्थानबध्द करण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक नूरूल हसन, अपर पोलिस अधिक्षक डॉ. सागर रतनकुमार कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनात स्था. गु.शा. वर्धा, ठाणेदार पराग पोटे, पो.स्टे. वर्धा शहर, स.फौ. संजय खल्लारकर, गिरीश कोरडे, पो.हवा. अमोल आत्राम ना. पो. शि. प्रदिप वाघ, गोपाल बावनकर, स्था. गु.शा., वर्धा पो.हवा. प्रदिप राऊत, ना.पो.शि. दिपक जंगले पो.स्टे. वर्धा शहर यांनी केली.