Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मोदी सरकार ३.० पर्वाला सुरुवात; नरेंद्र मोदींनी घेतली पंतप्रधान पदाची शपथ, मंत्रिमंडळात दिग्गजांचा समावेश

12

नवी दिल्ली: आधी २०१४… नंतर २०१९… त्यानंतर आता सलग तिसऱ्यांदा मोदी ३.० च्या पर्वाला सुरुवात झाली आहे. नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. मी नरेंद्र दामोदर दास मोदी… असं म्हणत त्यांनी तिसऱ्यांदा गोपनियतेची शपथ घेतली. त्यांच्यासोबत एनडीएच्या ३६ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेत आहेत. दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळा पार पडला. या कार्यक्रमासाठी देशभरातून आणि जगभरातून पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील ७१ मंत्री शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः ७२ वे मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. मोदी ३.० कॅबिनेटमध्ये ३० कॅबिनेट मंत्री, ५ राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि ३६ राज्यमंत्री शपथ घेणार आहेत.
Modi 3.0 Ministers: जे.पी नड्डा केंद्रीय मंत्रिमंडळात; भाजपला या महिन्याच्या अखेरीस मिळणार नवा अध्यक्ष, माजी मुख्यमंत्र्याचे नाव आघाडीवर…
नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. नरेंद्र मोदी यांनी गोपनियतेची शपथ घेतली आहे. त्यांच्यासोबत एनडीएच्या काही दिग्गज नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यात राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, जेपी नड्डा, निर्मला सीतारामन, शिवराज सिंह चौहान यांचा समावेश आहे. भाजप नेते अमित शहा यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. यापूर्वीच्या सरकारमध्ये अमित शहा केंद्रीय गृहमंत्री होते. ते चार वेळा गुजरातचे आमदार होते. गांधीनगर मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा खासदार झाले. राजनाथ सिंह यांनी मोदी 3.0 कॅबिनेटमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली. राजनाथ सिंह मागील सरकारमध्ये संरक्षण मंत्री होते. ते लखनौचे नवनिर्वाचित खासदार आहेत.

भाजप नेते आणि नवनिर्वाचित खासदार नितीन गडकरी यांनी सलग तिसऱ्यांदा कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. गडकरी हे मोदींच्या मागील दोन्ही सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. त्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. निर्मला सीतारामन यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. एस जयशंकर यांनी नवीन सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी मोदी 3.0 कॅबिनेटमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली.

नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यात शेजारील देश आणि इतर देशांतील अनेक नेते सामील झाले. यात श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे, मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, सेशेल्सचे उपराष्ट्रपती अहमद अफिफ, भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे, नेपाळचे पंतप्रधान पुष्पाजी. कमल दहल ‘प्रचंड’, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ यांनी उपस्थिती लावली होती. तसेच भारतातील अनेक दिग्गजांनीही या शपथविधी सोहळ्याला उपस्थिती लावली होती. यात सुपरस्टार रजनीकांत, गौतम अदानी,राजनाथ सिंह, कंगना रणौत यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.