Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

गोंडखैरी येथील हातभट्टीची दारु गाळणार्या पारधी बेड्यावर सहा.पोलिस अधिक्षक यांची वॅाश आऊट मोहीम…

12


महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा

सहा.पोलिस अधिक्षक,सावनेर यांचे पथकाची स्थागुशा व आर सी पी च्या सहकार्याने गोंडखैरी येथील पारधी बेडयावरील गावठी हातभट्टीच्या दारूची निर्मीती करणाऱ्यांवर वॅाश आऊट मोहीम कार्यवाहीत,६.५० लक्ष रु चा मुद्देमाल जप्त करुन केला नष्ट…..

सावनेर(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
दि.(७) चे दुपारी ४.३७ वा. दरम्यान सहा पोलिस अधिक्षक अनिल म्हस्के यांना मुखबिरव्दारे मिळालेल्या माहिती वरून मौजा गोंडखैरी येथील पारधी बेड्यावर मोठ्या प्रमाणात गावठी हातभट्टीची दारू निर्मीती करण्यात येत आहे अशा माहितीवरून सहा पोलिस अधिक्षक अनिल म्हस्के यांनी सोबत स्था.गु.शा. नागपूर ग्रामिण, पोलिस स्टेशन सावनेर, केळवद, खापा नागपूर ग्रामिण येथील आर. सी.पी पथक यांचे एक विशेष पथक स्थापन करून गोंडखैरी येथील पारधी बेडयावर छापा कारवाई केली असता त्याठिकाणी एकुन १२ महिला आरोपी व ०५ पुरूष आरोपी १) अवदेश पवार २) बबन दशरथ गजबे ३) श्याम कन्हैया पवार ०४) राजेन्द्र गुलाबराव
गुजर ०५) प्रदिप प्रतापराव भोसले (गुड विक्रेता) सर्व रा. गोंडखैरी पारधीबेडा यांनी रनींग भटटी काढतांना मिळुन आले

सदर आरोंपीवर कार्यवाही करून सदर प्रकरणात निळया प्लास्टिक व लोखंडी ड्रम, १०२ नग किंमत २०,४००/- रूपये,मोहाफुल सडवा २६,५०० लीटर एकुण किमती ५,३०,००० /-रूपये काळा गुळ – ११६० किलो किंमती ५८,०००/-रू. जर्मन घमेले–५ किंमती १०००रू. गुड मोजण्याचे इलेक्ट्रीक वजन काटा किंमत १०,०००रू. मोहाफुल गावठी दारू, ६४३ लीटर किंमत ३२,१५०/- रू., जळाऊ लाकुड, व इतर दारू गाळण्याचे साहित्य, पाईप, असा एकुण ६,५१,५५०/- रूपयाचा माल जप्त करून जागीच नष्ट करण्यात आला. वरील सर्व आरोपींवर मदाका कलम ६५ (b) (c ) (e),) (f)
अन्वये कार्यवाही करण्यात आली.

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक हर्ष पोद्यार, अपर पोलिस अधिक्षक रमेश धुमाळ,सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी सावनेर अनिल मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलिस निरीक्षक स्थागुशा ओमप्रकाश कोकाटे, सपोनि किशोर शेरकी, आशिष ठाकुर, पोउपनि आशिष मोरखेडे व स्टॉफ,ठाणेदार पोलिस स्टेशन केळवद राकेश साखरकर ठाणेदार केळवद व स्टाफ, पोउपनि जंगम व खापा येथील स्टाफ, पोउपनि स्वप्निल गेडाम व सावनेर येथील स्टाफ, उपविभागिय पोलिस अधिकारी कार्यालय सावनेर येथील मपोहवा संगिता कोवे,पोशि नितेश पुसाम.व आर.सी.पी पथक नागपूर ग्रामिण यांनी  केली.

Leave A Reply

Your email address will not be published.