Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Full List Of Modi Cabinet Members: नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदाची शपथ; मोदींच्या मंत्रिमंडळातील सदस्यांची नावे वाचा संपूर्ण यादी

14

नवी दिल्ली: राजधानीत राष्ट्रपती भवन परिसरात झालेल्या भव्य कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. मोदींसोबत मंत्रिमंडळातील अन्य सहकाऱ्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नरेंद्र मोदींनी पद आणि गोपिनियतेची शपथ दिली. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे मोदी हे पहिलेच नेते आहेत. या कार्यक्रमासाठी देश आणि विदेशातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ३० कॅबिनेट आणि ४२ राज्य मंत्री अशा एकूण ७२ जणांना शपथ दिली. यात भाजपच्या ६१ जणांचा समावेश आहे. या मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून २ कॅबिनेट आणि ४ राज्य मंत्र्यांचा समावेश आहे. मोदींनी मंत्रिमंडळात ६ महिलांना स्थान दिले आहे.

या क्रमाने झाला शपथविधी

१) नरेंद्र मोदी, पंतप्रधान
२) राजनाथ सिंह, कॅबिनेट मंत्री (भाजप)
३) अमित शहा, कॅबिनेट मंत्री (भाजप)
४) नितीन गडकरी, कॅबिनेट मंत्री (भाजप,महाराष्ट्र)
५) जे.पी. नड्डा, कॅबिनेट मंत्री (भाजप)
६) शिवराज सिंह चौहान, कॅबिनेट मंत्री (भाजप)
७) निर्मला सितारमन, कॅबिनेट मंत्री (भाजप)
८) एस.जयशंकर, कॅबिनेट मंत्री (भाजप)
९) मनोहरलाल खट्टर, कॅबिनेट मंत्री (भाजप)
१०) एच.डी कुमारस्वामी, कॅबिनेट मंत्री (जनता दल)
११) पियुष गोयल, कॅबिनेट मंत्री (भाजप, महाराष्ट्र)
१२) धर्मेंद्र प्रधान, कॅबिनेट मंत्री (भाजप)
१३) जीतनराम मांझी, कॅबिनेट मंत्री (हिंदुस्थानी अवाम मोर्चा)
१४) राजीव रंजन सिंह, कॅबिनेट मंत्री (जनता दल संयुक्त)
१५) सर्बानंद सोनोवाल, कॅबिनेट मंत्री (भाजप)
१६) वीरेंद्र कुमार, कॅबिनेट मंत्री (भाजप)
१७) राम मोहन नायडू, कॅबिनेट मंत्री (टीडीपी)
१८) प्रल्हाद जोशी, कॅबिनेट मंत्री (भाजप)
१९) जुएल ओराम, कॅबिनेट मंत्री (भाजप)
२०) गिरीराज सिंह, कॅबिनेट मंत्री (भाजप)
२१) अश्विनी वैष्णव, कॅबिनेट मंत्री (भाजप)
२२) ज्योतिरादित्य शिंदे, कॅबिनेट मंत्री (भाजप)
२३) भूपेंद्र यादव, कॅबिनेट मंत्री (भाजप)
२४) गजेंद्रसिंह शेखावत,कॅबिनेट मंत्री
२५) अन्नपूर्णा देवी,कॅबिनेट मंत्री (भाजप)
२६) किरण रिजुजू,कॅबिनेट मंत्री (भाजप)
२७) हरदीपसिंग पुरी,कॅबिनेट मंत्री (भाजप)
२८) मनसुख मांडविय,कॅबिनेट मंत्री (भाजप)
२९) जी. किशन रेड्डी,कॅबिनेट मंत्री (भाजप)
३०) चिराग पासवान,कॅबिनेट मंत्री (लोक जनशक्ती पार्टी)
३१) सी.आर. पाटील,राज्य मंत्री (भाजप)
३२) राव इंद्रजित सिंह, राज्य मंत्री (भाजप)
३३) डॉ. जितेंद्र सिंह, राज्य मंत्री (भाजप)
३४) अर्जुन राम मेघवाल, राज्य मंत्री (भाजप)
३५) प्रतापराव जाधव, राज्य मंत्री (शिवसेना,महाराष्ट्र)

३६) जयंत चौधरी, राज्य मंत्री (राष्ट्रीय लोकदल)
३७) जितीन प्रसाद, राज्य मंत्री (भाजप)
३८) श्रीपाद नाईक, राज्य मंत्री (भाजप)
३९) पंकज चौधरी, राज्य मंत्री (भाजप)
४०) कृष्णपाल, राज्य मंत्री (भाजप)
४१) रामदास आठवले, राज्य मंत्री (रिपाई, महाराष्ट्र)

४२) रामनाथ ठाकूर, राज्य मंत्री (डेडीयू)
४३) नित्यानंद राय, राज्य मंत्री (भाजप)
४४) अनुप्रिया पटेल, राज्य मंत्री (अपना दल)
४५) व्ही.सोमण्णा, राज्य मंत्री (भाजप)
४६) चंद्रशेखर पेम्मासानी, राज्य मंत्री (टीडीपी)
४७) एसपी सिंह बघेल, राज्य मंत्री (भाजप)
४८) शोभा करंदलाजे, राज्य मंत्री (भाजप)
४९) किर्तीवर्धन सिंह, राज्य मंत्री (भाजप)
५०) बी.एल. वर्मा, राज्य मंत्री (भाजप)
५१) शंतनू ठाकूर, राज्य मंत्री (भाजप)
५२) सुरेश गोपी, राज्य मंत्री (भाजप)
५३) एल. मुरुगन, राज्य मंत्री (भाजप)
५४) अजय टामटा, राज्य मंत्री (भाजप)
५५) बंडी संजय, राज्य मंत्री (भाजप)
५६) कमलेश पासवान, राज्य मंत्री (भाजप)
५७) भगीरथ चौधरी, राज्य मंत्री (भाजप)
५८) सतीशचंद्र दुबे, राज्य मंत्री (भाजप)
५९) संजय सेठ, राज्य मंत्री, (भाजप)
६०) रवनीत सिंग बिट्टू, राज्य मंत्री (भाजप)
६१) दुर्गादास उईके, राज्य मंत्री (भाजप)
६२) रक्षा खडसे, राज्य मंत्री (भाजप, महाराष्ट्र)

६३) सुकांता मुजूमदार, राज्य मंत्री (भाजप)
६४) सावित्री ठाकूर, राज्य मंत्री (भाजप)
६५) तोखन साहू, राज्य मंत्री (भाजप)
६६) राजभूषण चौधरी, राज्य मंत्री (भाजप)
६७) भूपतीराजू श्रीनिवास वर्मा, राज्य मंत्री (भाजप)
६८) हर्ष मल्होत्रा, राज्य मंत्री (भाजप)
६९)
७०) मुरलीधर मोहोळ, राज्य मंत्री (भाजप, महाराष्ट्र)

७१) जॉर्ज कुरीयन, राज्य मंत्री (भाजप)
७२) पवित्र मार्गेरिटा, राज्य मंत्री (भाजप)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.