Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मोदींचा शांततेचा पोकळ दावा, शपथविधी सुरू असताना दहशतवादी हल्ला, खरगेंनी पहिल्याच दिवशी वात पेटवली

11

जम्मू काश्मीर: जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात यात्रेकरूंच्या बसवर दहशतवादी हल्ला झाल्याची घटना घडली आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर बस पलटी होऊन खोल दरीत कोसळली. यात १० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर या घटनेत ३३ भाविक जखमी झाले आहेत. यानंतर आता मल्लिकार्जून खरगेंनी मोदी सरकावर टीकास्त्र सोडले आहे. एनडीएचे सरकार आल्यापासून दहशतवादी हल्ले कमी झाले आहेत, असं सातत्याने नरेंद्र मोदी म्हणतात. मात्र त्यांचा हा दावा खोटा ठरत असल्याची टीका खरगेंनी केली आहे. आज नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा सुरू आहे. तर दुसरीकडे याचवेळी दहशतवादी हल्ला झाला. यामुळे खरगेंनी मोदी सरकारवर पहिल्याच दिवशी निशाणा साधला.

मल्लिकार्जून खरगे नेमकं काय म्हणाले?

या घटनेनंतर मल्लिकार्जून खरगे यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे. ट्विटमध्ये खरगे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या NDA सरकारचा शपथविधी होत असताना आणि अनेक देशांचे प्रमुख देशात असताना, यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात किमान १० भारतीयांचा मृत्यू झाला आहे. आमच्या लोकांवर झालेल्या या भीषण दहशतवादी हल्ल्याचा आणि आमच्या राष्ट्रीय सुरक्षेचा जाणीवपूर्वक अपमान केल्याचा आम्ही निर्विवादपणे निषेध करतो. पीडितांच्या कुटूंबियांप्रती आमची मनःपूर्वक संवेदना आहे आणि जखमी लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो. सरकारने आणि अधिकाऱ्यांनी पीडितांना तातडीने मदत आणि भरपाई द्यावी. फक्त तीन आठवड्यांपूर्वी, पहलगाममध्ये पर्यटकांवर गोळीबार झाला होता आणि जम्मू-काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी घटना अव्याहतपणे सुरू आहेत. मोदी (आताच्या एनडीए) सरकारचा शांतता आणि सामान्यता प्रस्थापित करण्याचा सर्व छातीठोक प्रचार पोकळ ठरतो. भारत दहशतवादाविरोधात एकजुटीने उभा आहे, असं ते म्हणाले आहेत.

राहुल गांधींनीही दिली प्रतिक्रिया

या घटनेवर राहुल गांधी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील शिवखोडी मंदिरातून भाविकांना घेऊन जाणाऱ्या बसवर झालेला भ्याड दहशतवादी हल्ला अत्यंत दुःखद आहे. ही लाजिरवाणी घटना म्हणजे जम्मू-काश्मीरमधील चिंताजनक सुरक्षा परिस्थितीचे खरे चित्र आहे. मी सर्व शोकग्रस्त कुटुंबियांबद्दल माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो आणि जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्याची आशा करतो. दहशतवादाविरोधात संपूर्ण देश एकजुटीने उभा आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.