Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Box Office Collection : ‘मुंज्या’ चं भूत घालतंय बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; जाणून घ्या सिनेमाची तीन दिवसीय कमाई
Sacknilkच्या रिपोर्टनुसार, ‘मुंज्या’ या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी ४ कोटींची कमाई केली. त्यानंतर शुक्रवारच्या तुलनेत, शनिवारी ८१.२५ टक्क्यांपेक्षा अधिक कमाई केली. शुक्रवारी या चित्रपटाने ७ कोटी २५ लाखांची कमाई केली होती.
या चित्रपटाच्या तिसऱ्या दिवसाची कमाईसुद्धा समोर आली आहे. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने रात्री १०:३० वाजेपर्यंत ७ कोटी ७५ लाख रुपये कमावले. आतापर्यंत ‘मुंज्या’ या चित्रपटाची कमाई एकूण १९ कोटी रुपये इतकी झाली आहे.
‘मुंज्या’ या चित्रपटाचं बजेट जवळपास ३० कोटी रुपये इतकं आहे. चित्रपटाची विकेंडची कमाई पाहता असं वाटतंय की, हा चित्रपट बजेट क्रॉस करेल.हा चित्रपट मॅडॉक फिल्म्सच्या हॉरर कॉमेडी युनिव्हर्सचा एक भाग आहे. यापूर्वी त्यांनी ‘स्त्री’, ‘भेडिया’ आणि ‘रुही’ या चित्रपटांची निर्मिती केली होती.
‘मुंज्या’ हा चित्रपट मराठी लोककथेवर आधारित असून यामध्ये एका पौराणिक प्राण्याबद्दल सांगितलं आहे. या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे, हा भारतातील पहिला असा चित्रपट आहे ज्यामध्ये मुख्य पात्र पूर्णपणे CGI च्या मदतीने तयार केलं गेलं आहे.
काय आहे चित्रपटाची कथा?
चित्रपटाचं कथानक हे १९५२ सालापासून सुरु होतं, जेव्हा एका मुलाचं आणि मुन्नीचं लग्न होत नाही. मुलाचं मुंडन केलं जातं आणि मुन्नीचं दुसऱ्या कोणाशी तरी लग्न लावलं जातं. मुलगा जादूटोणा करतो आणि त्यात त्याचा जीव जातो. त्यानंतर त्या मुलाचं भूत बनतं आणि ते भूत मुन्नीचा शोध घेऊ लागतं.