Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या बाहेर महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांच्या वतीने एक भावनिक होर्डिंग लावण्यात आलं आहे. हे होर्डिंग सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. शिवसेना पक्ष दोन गटांमध्ये विभागले गेल्यानंतर राज्यातील शिवसैनिकांची अवस्था कोणता झेंडा घेऊ हाती, अशी झाली होती. लोकसभा निवडणुकीत देखील याचे पडसाद उमटले होते. आता तर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणि केंद्रात सरकार स्थापन झाल्यानंतरही महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांची भावना या होर्डिंगवर उमटताना दिसतेय.
सर्व शिवसैनिक आणि नेत्यांना पुन्हा एकदा एकत्र येण्याचं आवाहानच या होर्डिंगमधून करण्यात आलंय. शिवसैनिकांनो, वाघांनो… संघटित व्हा ! महाराष्ट्राच्या विकासाला गतीशील बनवा ! आपल्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा ! असं या होर्डिंगवर लिहिलं आहे.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
ठाकरे गटाची प्रतिक्रिया काय?
दरम्यान, शिवसेना ही भावनिक ऐक्यावर आधारित संघटना आहे. त्यामुळे बाळासाहेबांनी पाहिलेलं महाराष्ट्राच्या ऐक्याचं स्वप्न, हेच शिवसेनेचं अंतिम ध्येय आहे. याला अनुसरुन सामान्य शिवसैनिकांच्या ज्या भावना आहेत, त्यांचा आम्हाला आदरच आहे. त्यांच्यासाठी मातोश्री आणि शिवसेनेचे दरवाजे कायमच उघडे राहतील. मात्र ज्यांनी शिवसेना फोडण्याचं मोठं कारस्थान रचलं. त्याच वेळी शिवसेनेला आणि पर्यायाने महाराष्ट्राला संकटाच्या खाईत लोटण्याचा प्रयत्न केला, अशा कपट कारस्थानी लोकांना सोबत घ्यायचं की नाही, याचा सर्वस्वी निर्णय पक्षश्रेष्ठींचा असेल, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दिली.