Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

PM Modi After Oath Ceremony : पंतप्रधानपदाची शपथ घेताच मोदी म्हणाले,हे लोकांचे कार्यालय असले पाहिजे मोदींचे नाही

9

नवी दिल्ली : शपथविधीनंतर पंतप्रधानपदाचा कार्यभार स्विकारताच मोदींनी आपला संकल्प व्यक्त केला आहे. सोमवारी पंतप्रधान कार्यालयातील अधिकाऱ्यांना संबोधित करताना ते म्हणाले की,’ हे लोकांचे कार्यालय असले पाहिजे,मोदींचे नाही.’ आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण हा देशाच्या प्रगतीसाठी समर्पित असल्याचे सांगत त्यांनी अधिकाऱ्यांना संबोधित केले.

पंतप्रधान कार्यालय हे लोकांचे कार्यालय असले पाहिजे, मोदींचे नाही

दहा वर्षांपूर्वी पंतप्रधानकार्यालय हे एक मोठे शक्तीचे केंद्र आहे अशी लोकांमध्ये प्रतिमा होती. पण मी सत्तेसाठी जन्मलो नव्हतो. ना मी कधी शक्ती प्राप्त करण्याचा विचार केला. पंतप्रधान कार्यालय हे सत्तेचे केंद्र बनावे अशी माझ्यासाठी कधीच इच्छा नव्हती वा मार्ग नव्हता. २०१४ पासून आम्ही ही भूमिका घेतली आहे. आम्ही याला एक ‘उत्प्रेरक एजन्ट'(उर्जा देणारे एक माध्यम) च्या रुपामध्ये विकसित करण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधान कार्यालय हे लोकांचे कार्यालय असले पाहिजे ते मोदींचे कार्यालय होवू शकत नाही.’ आपल्या संबोधना दरम्यान मोदी म्हणाले.
Modi Cabinet: मोदी ३.० मंत्रिमंडळात अजून किती जागा शिल्लक? कॅबिनेट, राज्य मंत्र्यांमध्ये काय फरक असतो? कोणाला किती पगार, जाणून घ्या सर्व काही
आपल्या सोबत अथक काम करणारे सर्व एक टीम (संघ) आहेत असे सांगत ते पुढे म्हणाले की, ‘आम्ही ती लोकं नाही आहोत ज्यांचं कार्यालय अमुक या वेळी सुरु होतं आणि अमुक या वेळी बंद होतं. आम्ही वेळेशी बांधले गेलो नाहीत,आमच्या विचारांना कोणतीच सीमा नाही आणि आमच्या प्रयत्नांना कोणताच मापदंड नाहीत. या सर्वांच्या पलीकडचे जे आहेत त्यांचा मिळून माझा संघ आहे. या संघावर संपूर्ण देश विश्वास ठेवतो.’

यशस्वी मनुष्य तोच आहे ज्याच्यातला विद्यार्थी कधी मरत नाही

१४० करोड भारतीयांसाठी आपले आयुष्य समर्पित असल्याचे सांगत पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘१४० कोटी भारतीयांशिवाय माझ्या मनात कोणी नाही.ते फक्त लोक नाहीत तर परमात्म्याचे रुप आहेत.जेंव्हा आपण सरकारमध्ये काही निर्णय घेतो तेंव्हा मी असा विश्वास ठेवतो की मी १४० करोड भारतीयांची पूजा केली आहे.या भावनेने मी काम करत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच ‘राष्ट्र प्रथम’ हे ध्येय ठेवून २०४७ पर्यंत आपण विकसित भारताचे स्वप्न साकार करु असा विश्वास व्यक्त केला. यशस्वी मनुष्य तोच आहे ज्याच्यातला विद्यार्थी कधी मरत नाही असे सांगत त्यांनी आपल्या मनोगताचा समारोप केला.

पंतप्रधान मोदी यांनी रविवारी आपल्या पंतप्रधान पदाच्या तिसऱ्या कार्यकालाची शपथ घेतली.देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु तसेच इंदिरा गांधींनंतर तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे ते तिसरे भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. शपथविधी होताच त्यांनी सोमवारी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या पहिल्या फाईलवर सही केली.यातून देशभरातील जवळपास ९.३ कोटी पात्र शेतकऱ्यांना PM किसानचा १७ वा हप्ता वितरीत करण्याबद्दलची कार्यवाही पुर्ण केली.शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन विरोधकांकडून घेरले जात असताना मोदींनी याद्वारे शेतकरी प्रश्नांचा प्राधान्याने विचार करण्याचा संदेश दिला असल्याचे म्हटले जात आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.