Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
BJP National President : जे.पी. नड्डा आता केंद्रीय मंत्री, भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची खुर्ची होणार रिकामी, महाराष्ट्रातील ‘या’नेत्याची लागू शकते वर्णी..
नड्डा यांचा कार्यकाळ झाला पूर्ण
भाजपा नेते जे. पी. नड्डा यांचा भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा कार्यकाळ जानेवारीत पूर्ण झाला आहे. परंतु त्यांना लोकसभा निवडणुक होईपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता जे. पी. नड्डा मंत्रिमंडळात सहभागी झाले असून पक्षाला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान,नड्डा यांच्या नंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून धर्मेंद्र प्रधान, शिवराजसिंह चौहान, मनोहरलाल खट्टर आणि भूपेंद्र यादव यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरु होती. मात्र त्यांनीही आता मंत्रीपद मिळाले आहे.
विनोद तावडेंची लागू शकते वर्णी
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. विनोद तावडे हे महाराष्ट्राचे असून राष्ट्रीय राजकारणात येण्यापूर्वी ते राज्य सरकारमध्ये मंत्री राहिले आहेत. पाच वर्षांपूर्वी विधानसभेचे तिकीट तावडे यांना मिळाले नव्हते. त्यावरून देखील मोठी चर्चा रंगली होती. त्यानंतर त्यांनी मोदी अमित शाह यांचा विश्वास संपादन केला. आणि तावडे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि बिहारचे प्रभारी बनले.
इतर नेत्यांची नावे चर्चेत
विनोद तावडे याच्या शिवाय उत्तर प्रदेशचे ज्येष्ठ नेते डॉ. दिनेश शर्मा यांचेही नाव चर्चेत आहे. शर्मा हे राज्यसभेचे खासदार असून पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. तसेच सुनील बन्सल हे ओडिशा, बंगाल आणि तेलंगणाचे प्रभारी आहेत. याआधी त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. बन्सल यांनी अल्पावधीतच भाजप हायकमांडचा विश्वास जिंकला. त्यामुळे या पदासाठी बन्सल यांचे नाव देखील चर्चेत आहे.