Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

लोकसभेची पहिली टर्म, काल मंत्रिपदाची शपथ अन् आज भाजपचा मंत्री म्हणतोय, मला मोकळं करा! पण का?

7

थिरुअनंतपुरम: नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत ७१ खासदारांनी मंत्रिपद आणि गोपनियतेची शपथ घेतली. यामध्ये केरळचे खासदार सुरेश गोपी यांचाही समावेश आहे. ते केरळमधील भाजपचे पहिले खासदार आहेत. काल राज्यमंत्रिपदाची शपथ घेणारे गोपी मंत्रिपद सोडू शकतात. शपथविधी सोहळ्यानंतर दिल्लीत एका प्रादेशिक वृत्तवाहिनीशी संवाद साधताना त्यांनी याबद्दलचे संकेत दिले. मंत्रिपद सोडण्याची इच्छा त्यांनी स्पष्टपणे बोलून दाखवली.

मी मंत्रिपद मागितलेलं नाही. त्यामुळे मला लवकरच यातून मोकळं केलं जाईल अशी आशा आहे, अशी भावना सुरेश गोपींनी बोलून दाखवली. सुरेश गोपी पार्श्वगायक आहेत. छोट्या पडद्यावरही ते सक्रिय असतात. वृत्तवाहिनीशी संवाद साधताना त्यांनी मंत्रिपद सोडण्याची इच्छा व्यक्त करण्यामागील कारणं सांगितली. ‘मी चित्रपटांसाठी करार केले आहेत. मला ते पूर्ण करायचे आहेत. मी त्रिशूरचा खासदार म्हणून काम करेन,’ असं गोपी यांनी सांगितलं. गोपींच्या भूमिकेवर पक्ष काय निर्णय घेतो ते पाहणं महत्त्वाचं असेल.
शिंदेसेनेपेक्षा कमी खासदार, तरीही मारली बाजी; मोदींच्या हनुमानाची वरचढ कामगिरी, ताकद दाखवली
सुरेश गोपींनी त्रिशूर लोकसभा मतदारसंघात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार व्ही. एस. सुनीलकुमार यांचा ७४ हजार ६८६ मतांनी पराभव केला. गोपी यांच्या रुपात भाजपला केरळमध्ये पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीत यश मिळालं. त्यामुळे गोपी यांचा विजय भाजपसाठी ऐतिहासिक आहे. गेल्या निवडणुकीत त्रिशूरची जागा काँग्रेसनं जिंकली होती. लोकसभेवर जाण्याआधी सुरेश गोपी राज्यसभेचे सदस्य होते. २०१६ मध्ये ते राज्यसभेवर गेले. त्यांचा कार्यकाळ २०२२ मध्ये संपला.

सुरेश गोपी मूळचे केरळच्या अलप्पुझाचे रहिवासी आहेत. त्यांचा जन्म १९५८ मध्ये झाला. विज्ञान शाखेत ते पदवीधर असून इंग्रजीत त्यांनी मास्टर्सपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. बाल कलाकार म्हणून त्यांनी चित्रपटसृष्टीत कारकीर्द सुरु केली. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. बऱ्याच सिनेमांमध्ये ते मुख्य भूमिकेत दिसले आहेत. १९९८ मध्ये प्रदर्शित झालेल्या कलियाट्टम सिनेमातील भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. बऱ्याच कालावधीपासून ते टीव्ही शोचे होस्ट म्हणूनही काम करत आहेत.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.