Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आजचे अंकभविष्य, 11 जून 2024 : मूलांक 2 असणाऱ्यांनी रागावर ठेवा ताबा! मूलांक 6 असणाऱ्यांनी विरोधकांकडे करा दुर्लक्ष ! जाणून घ्या, तुमचा दिवस कसा असेल?
मूलांक १ : धैर्याने आव्हानांचा सामना करा
कार्यस्थळी वातावरण अनुकूल राहील. एखाद्या व्यक्तीमुळे काम वाढू शकते, पण लवकर परिस्थिती सामान्य होईल आणि तुम्ही पुन्हा चांगल्यापैकी काम करू शकाल. धाडसाने पुढे मार्गक्रमण चालू ठेवा, तुम्हाला यश नक्कीच मिळेल.
शुभ अंक – २
शुभ रंग- निळा
मूलांक २ : रागाच्या भरात कोणताही निर्णय नको

घरी सौहार्दपूर्ण वातावरण राहील. मुलांमुळे काही तणाव किंवा राग वाढू शकतो, त्यामुळे स्वतःवर संयम ठेवा. रागाच्या भरात कोणाताही निर्णय घेऊ नका, त्यामुळे तुमच्या अडचणी वाढतील.
शुभ अंक – ८
शुभ रंग- पिवळा
मूलांक 3: वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन ठेवा

कौटुंबिक जीवनात काही कारणामुळे जास्त काम राहील, त्यामुळे तुम्ही इतर कामांतून सुट्टी घ्याल. आजच्या दिवशी शॉपिंगची संधी मिळेल. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन ठेवण्याचा प्रयत्न करा, यातून लाभ होईल.
शुभ अंक – ६
शुभ रंग – हिरवा
मूलांक ४ : कामाशी प्रामाणिक राहा

वैवाहिक जीवनात गोडवा राहील, पण तुम्हाला आज आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. आज तुम्हाला कामाप्रति प्रमाणिक राहाण्याची गरज आहे, अन्यथा काही तणाव उत्पन्न होईल. तसेच तुम्हाला आज संयमाने विषयांवर मार्ग काढावा लागेल.
शुभ अंक – ३
शुभ रंग- केशरी
मूलांक ५ : पराक्रमाने आव्हानांवर मात कराल

आज तुमचे विरोधक वाढतील, आणि त्यामुळे तुम्हाला सर्व कामे सजग होऊन करायची गरज आहे. आज तुमचा पराक्रम आणि निर्णय क्षमता यात वाढ होताना दिसेल. आज तुम्ही धाडसाने समस्यांवर मात करण्यात यशस्वी व्हाल.
शुंभ अंक – २५
शुभ रंग- पांढरा
मूलांक ६ : आज विरोधकांकडे दुलर्क्ष करा

मूलांक ६ असणाऱ्यांनी काही गोष्टी लक्षात ठेवा. यावेळी कार्यक्षेत्रात काही बदल दिसत आहेत. त्यामुळे तुम्ही विरोधकांना पराजित करण्यात यशस्वी व्हाल. विरोधकांकडे दुलर्क्ष करा, अन्यथा तुमचा मानसिक ताण वाढू शकतो.
शुभ अंक – १५
शुभ रंग – पिवळा
मूलांक ७ : मानसिक तणाव राहील

आजच्या दिवशी कोर्ट केस किंवा कोणासोबतचा तणाव यामुळे मानसिक त्रासाची शक्यता आहे. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. तुम्हाला इतरही काही अडचणींना तोंड द्यावे लागू शकते.
शुभ अंक २१
शुभ रंग – निळा
मूलांक 8: सहकाऱ्यांशी संघर्ष नको

कायदेशीर समस्यांच्या कारणामुळे पैसा अधिक खर्च होईल. कार्यस्थळी सहकाऱ्यांसोबत कोणाताही वाद होऊ देऊ नका. तुम्ही आज कष्टाने काम कराल आणि तुम्हाला याचा लाभ मिळेल. आज कुटुंबाच्या वादात लक्ष घालू नका.
शुभ अंक – १६
शुभ रंग-लाल
मूलांक ९ : प्रवासाचे योग बनत आहेत.

कामानिमित्त दूरच्या प्रवासाचे संकेत आहेत. पण शक्यता अशीही दिसते की प्रवासात प्रकृतीसंबंधीचे त्रास होऊ शकतात. त्यामुळे प्रवासात सांभाळून राहा. प्रवासावर निघण्यापूर्वी आरोग्याची काळजी घ्या.
शुभ अंक – २८
शुभ रंग – आकाशी