Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
भारतीय परंपरेनुसार आई-वडिल किंवा मोठ्या व्यक्तींना वाकून, म्हणजे त्यांच्या पायाला हात लावून नमस्कार करावा, हा संस्कार बालपणापासून केला जातो. आपल्याकडे
तिन्हीसांजेला दिवेलागणी, प्रवासाला निघताना, अगदी नवीन कपडे परिधान केल्यावरही विविध प्रसंगी घरातील मोठ्या व्यक्तींच्या पाया पडण्याची पद्धत आहे. आपल्यापेक्षा ज्येष्ठ
व्यक्तीच्या पायांना स्पर्श करणे म्हणजे आदर व्यक्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग मानलेला आहे.
जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या पायाला आपण स्पर्श करतो, त्यावेळी ती व्यक्ती आपल्याला आशीर्वाद देते. हे आशीर्वाद आपल्याला जीवनात मार्गक्रमण करण्यासाठी फलदायी असतात तसेच आयुष्यात यश, आनंद आणि शांती घेऊन येतात. म्हणून तर आपण देव-देवता, संत, महात्मे, गुरु आणि ज्येष्ठांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतो. पण, पायांना स्पर्श करण्याची पद्धत योग्य असली पाहिजे. शास्त्रात हे देखील सांगितले आहे की व्यक्तीच्या पायांना कधी आणि कसे स्पर्श करू नये. जर तुम्ही कोणाच्या पायाला स्पर्श करत असाल तर या गोष्टींची विशेष काळजी घ्या.
1. मंदिरात देवा समोर कोणाच्याही पाया पडू नका.
तुम्ही मंदिरात आहात किंवा देवाच्या मूर्तीसमोर उभे आहात तर, कोणाच्याही पायाला हात लावू नये असे शास्त्रात सांगितले आहे. शास्त्रानुसार भगवंतापेक्षा मोठा कोणी नाही, म्हणून जर तुम्ही देवाच्या मूर्तीसमोर असाल तर प्रथम देवाच्या चरणांना स्पर्श करा. तसेच मंदिरात तुमच्यापेक्षा मोठ्या व्यक्ती किंवा वडीलधारी व्यक्ती तुम्हाला भेटली तर त्यांच्या पायांना हात लावू नका. तुमची खूप इच्छा आहे त्यांना नमस्कार करण्याची तर फार तर तुम्ही हात जोडून त्यांचे स्वागत करू शकता.
2. झोपलेल्या व्यक्तीला नमस्कार करू नये.
शास्त्रानुसार, झोपलेल्या व्यक्तीची उर्जा वेगळी असते आणि ती ऊर्जा जी व्यक्ती जागी आहे त्याच्या उर्जेशी जुळत नाही. झोपलेली व्यक्तीची उर्जा सुप्त असते आणि तो त्यावेळी फक्त त्याच्या अवचेतन मनाशी जोडलेला असतो. अशा स्थितीत जेव्हा तुम्ही एखाद्याच्या पायाला स्पर्श करता तेव्हा तुम्ही अशी ऊर्जा शोषून घेता, ज्याचा तुमच्यासाठी काहीही उपयोग होत नाही आणि जर झोपलेल्या व्यक्तीच्या मनात किंवा त्याच्या स्वप्नात काही चुकीचे विचार चालू असतील, तर ते तुमचे नुकसानही करू शकतात. झोपलेल्या व्यक्तीच्या शरीरात असलेली ऊर्जा देखील नकारात्मक असू शकते, ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरातही प्रवेश करू शकते. यामुळे पायाला स्पर्श करणारी व्यक्ती आणि ज्याच्या पायाला स्पर्श केला जात आहे अशा दोघांनाही हानी होऊ शकते. म्हणून झोपलेल्या व्यक्तीच्या पायाला हात लावून नमस्कार करू नये. पायांना स्पर्श करण्यासाठी योग्य स्थितीचा अवलंब करणे महत्त्वाचे असून, त्यामुळेच पायांना योग्य प्रकारे स्पर्श कसा करायचा याचा नियम केलेला आहे.
3. भोजन करत असलेल्या व्यक्तीला नमस्कार नको.
जेव्हा एखादी व्यक्ती भोजन करत असते तेव्हा त्या व्यक्तीला नमस्कार करु नये कारण त्यावेळी अन्न हे सर्वात मोठे आहे आणि तुम्हीला माहित असेलच की जेवणापूर्वी वदनी कवळ घेता… असे म्हणून पानात वाढलेल्या अन्नाला नमस्कार करून आपण भोजनाला सुरुवात केलेली असते. जेवण्याच्या स्थिती अन्ना शिवाय काही मोठे नाही आणि जर अशा अवस्थेत त्या व्यक्तीला नमस्कार केला तर जेवणारी व्यक्ती आशीर्वाद देवू शकत नाही. कारण उजव्या हाताने आपण आशीर्वाद देत असतो. जेवणारी व्यक्तीचा उजवा हात खरकटा असतो, मग अशा हाताने आशीर्वाद कसा द्यायचा? जेव्हा समोरच्या व्यक्तीचा हात आशीर्वादाच्या रूपाने आपल्या स्पर्श करतो तेव्हा सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरात येते, पण जेवणाच्या स्थितीत हे शक्य नाही.
4. स्मशानातून आलेल्या व्यक्तीला नमस्कार नको.
स्मशानातून परतणाऱ्या व्यक्तीच्या पायांना स्पर्श करू नये, असे शास्त्रात सांगितले आहे. अंत्यसंस्कारातून परतल्यानंतर त्या व्यक्तीच्या सभोवताली नकारात्मक ऊर्जेचा सहवास काही प्रमाणात झालेला असतो. समजा अशा व्यक्तीच्या पायाला आपण स्पर्श केला तर त्याच्याकडील नकारात्मकता आपल्यात येवू शकते. म्हणून स्मशानातून परतणाऱ्या व्यक्तींना चरणस्पर्श करु नये.
5. जावयाकडून नमस्कार करून घेवू नये.
शास्त्रात सांगितले आहे की, जावयाकडून तुम्ही चरणस्पर्श करून घेवू नका, असे केल्यामुळे तुमचे पुण्य नष्ट होते. विवाह विधीमध्ये जावयाचे पाय धुतले जातात. आपल्या शास्त्रात जावई हा विष्णू स्वरुप आहे, असे ही मानले जाते, म्हणूनच जावयाने फक्त सासऱ्यांना हात जोडून नमस्कार करावा आणि सासऱ्यांनी त्याला आशीर्वाद द्यावा.
6. या व्यक्तींकडून नमस्कार करून घेवू नका.
कुमारीका या देवी स्वरुप असतात, आपण नवरात्रात कुमारीका पूजन करतो. म्हणून मुलींकडून चरणस्पर्श करू नका. सन्यासी व्यक्ती फक्त आपल्या गुरुंना नमस्कार करतात त्यामुळे सन्यासी व्यक्तींकडून पाया पडून घेवू नये.
टीप : ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.