Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
New CM Of Odisha: मोहन माझी ओडिसाचे नवे मुख्यमंत्री; राज्याला २४ वर्षानंतर मिळाले नवे नेतृत्व, CMच्या मदतीला दोन उपमुख्यमंत्री
निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून नवा मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता लागली होती. अखेर आज मोहन माझी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. राज्यात दोन उपमुख्यमंत्री देखील असतील. सहा वेळा आमदार झालेले केव्ही सिंह आणि प्रथमच विधानसभेत आलेले प्रवती परिदा हे दोन उपमुख्यमंत्री असतील. राज्यातील नेतृत्व निवडीसाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची पर्यवेक्षण म्हणून नियुक्ती केली होती.
सिंह आणि यादव यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री निवडीसाठी बैठक झाली ज्यात मोहन माझी यांचे नाव निश्चित करण्यात आले.
कोण आहेत मोहन माझी?
मोहन माझी यांनी १९९७- २००० साली सरपंच म्हणून राजकीय करिअर सुरू केले होते. २००० साली क्योंझर मतदारसंघातून ते सर्वप्रथम विधानसभेवर गेले. गेल्या चार टर्मपासून त्यांनी क्योंझर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. माझी हे आदिवासी समाजातून असून उद्या १२ जून रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. विधानसभा निवडणुकीत त्यांनी ११ हजार ५७७ मतांनी विजय मिळवला होता.
मुख्यमंत्र्यांच्या मदतीला दोन उपमुख्यमंत्री
ओडिसाचे १५वे मुख्यमंत्री म्हणून माझी उद्या शपथ घेतील. ते राज्यातील पहिल्या भाजप सरकारचे नेतृत्व करणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या मदतीला राज्यात दोन उपमुख्यमंत्री देखील असतील. केव्ही सिंह देव आणि प्रवती परिदा हे राज्याचे दोन उपमुख्यमंत्री असतील. यातील केव्ही सिंह देव हे राजघराण्याशी संबंधित आहेत. ते पटनागड येथून सहाव्यांना विजयी झालेत. याआधी राज्यातील भाजप-बीजेडी युती सरकारमध्ये मंत्री होते. तर प्रवती परिदा या निमापाडा येथून प्रथमच आमदार झाल्या आहेत. त्या ओडिसा भाजपच्या महिला विभागाच्या अध्यक्ष होत्या.
असा लागला निकाल
147 सदस्यांच्या विधानसभेत भाजपने 78 जागा मिळवल्या. बीजेडीने 51 जागा जिंकल्या, तर काँग्रेसने 14 जागा घेतल्या आणि तीन अपक्ष उमेदवारांकडे गेल्या. विधानसभे सोबत लोकसभा निवडणुकीत बीजेडीला पराभवाचा सामना करावा लागला. राज्यात भाजपने २१ पैकी २० जागा जिंकल्या, तर काँग्रेसला एक जागा मिळाली.