Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Subodh Kumar Jaiswal फोन टॅपिंग: CBI संचालक सुबोध जयस्वाल यांना मुंबई पोलिसांचे समन्स

21

हायलाइट्स:

  • फोन टॅपिंग डेटा लीक प्रकरणी तपासाला गती.
  • सीबीआय संचालक सुबोध जयस्वाल यांना समन्स.
  • मुंबई सायबर पोलिसांनी बजावले समन्स.

मुंबई: महाराष्ट्र राज्य गुप्तचर विभागातून फोन टॅपिंग डेटा लीक झाल्या प्रकरणी महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन पोलीस महासंचालक आणि सीबीआयचे विद्यमान संचालक सुबोधकुमार जयस्वाल यांना मुंबई सायबर पोलिसांनी चौकशीला उपस्थित राहण्यासाठी समन्स जारी केले आहे. १४ ऑक्टोबर रोजी प्रत्यक्ष कार्यालयात हजर राहण्यास त्यांना सांगण्यात आले आहे. ( Mumbai Police Summoned Subodh Kumar Jaiswal )

वाचा: क्रूझवरून कोणाला पकडलं, कोणाला सोडलं?; NCBने ‘तो’ आरोप फेटाळला

महाराष्ट्र पोलीस दलातील बदल्या आणि बढत्यांसंदर्भात काही खासगी व्यक्ती, पोलीस अधिकारी यांचे फोन टॅपिंग लीक झाल्याप्रकरणी शासकीय गुपिते अधिनियम आणि इतर कलमांतर्गत सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी याआधी महिला पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदविण्यात आला आहे. याच प्रकरणात सुबोधकुमार जयस्वाल यांना १४ ऑक्टोबर रोजी मुंबई सायबर पोलिसांसमक्ष हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. जयस्वाल यांना ई-मेलच्या माध्यमातून हा समन्स पाठवण्यात आला असल्याचे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

वाचा:‘एनसीबीचं पुढचं टार्गेट अभिनेता शाहरूख खान’; ‘या’ मंत्र्यांचा सनसनाटी दावा

दरम्यान, महाराष्ट्र केडरचे १९८५च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले सुबोधकुमार जयस्वाल यांची याचवर्षी मे महिन्यात सीबीआय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दोन वर्षांसाठी ही नियुक्ती आहे. त्याआधी सुबोधकुमार हे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक होते. त्यांच्या कार्यकाळात फोन टॅपिंग प्रकरण घडले होते. त्यामुळेच त्यांना मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने समन्स बजावले असून या प्रकरणात जयस्वाल यांची चौकशी महत्त्वाची ठरणार आहे.

वाचा: ‘त्या’ तिघांना सोडण्यासाठी भाजपा नेत्यांचे फोन; समीर वानखेडेंनी उत्तर द्यावे’

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.