Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

रीलिजआधीच कार्तिक आर्यनच्या सिनेमाचे हालबेहाल; ‘चंदू चॅम्पियन’च्या १० हजार तिकिटांचीही विक्री नाही

11

मुंबई: अभिनेता कार्तिक आर्यनचा ‘चंदू चॅम्पियन’ हा सिनेमा येत्या १४ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी या सिनेमासाठी आगाऊ बुकिंग गेल्या रविवारी अर्थात ९ जूनपासून सुरू झाले. मोठ्या दिमाखात बुर्ज खलिफावर या सिनेमाचे Advance Booking सुरू झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र या दोन दिवसात अपेक्षित तिकिट खरेदी न झाल्याचे चित्र आहे. मंगळवारी संध्याकाळी ४ वाजपर्यंत कबीर खान दिग्दर्शित या सिनेमाच्या ७६२४ तिकिटांची विक्री झाली होती.’चंदू चॅम्पियन’ हा सिनेमा भारताचे पहिले पॅराऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर यांचा बायोपिक आहे. त्यांना २०१८ साली भारत सरकारच्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. कार्तिकने या सिनेमासाठी घेतलेली मेहनत ट्रेलर आणि सिनेमामधील गाण्यातून स्पष्ट दिसते आहे. अभिनेत्याने त्याची संपूर्ण शरीरयष्टीच या भूमिकेसाठी बदलली. मुरलीकांत पेटकर साकारण्यासाठी त्याने केलेले ट्रान्सफॉर्मेशन उल्लेखनीय आहे.

किती झाले आहे आगाऊ बुकिंग?

sacnilk च्या रिपोर्टनुसार, मंगळवारी संध्याकाळी ४ वाजेपर्यंत ‘चंदू चॅम्पियन’ची ७६२४ तिकिटे पहिल्या दिवसासाठी विकली गेली आहेत. यातून या सिनेमाची २२.६७ लाख रुपयांची कमाई झाली. सध्या २६०१ शोजसाठी तिकिटे बुक केली जात आहेत. याशिवाय ब्लॉक बुकिंगचाही समावेश केला तर, या चित्रपटाने रिलीजपूर्वी आतापर्यंत एकूण ५८ लाखांची कमाई केली आहे. मात्र, अद्याप रीलिजसाठी अडीच दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने आगाऊ बुकिंग आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Himesh Reshammiya: हिमेश रेशमियाशी पहिल्या पत्नीने करुन दिली होती मैत्रिणीची ओळख; ११ वर्षांनी तीच सवत म्हणून आली
‘मुंज्या’ची जादू

गेल्या जवळपास अडीच महिन्यांपासून बॉक्स ऑफिसची अवस्था तशी बिकटच आहे. या दरम्यान ७ जून रोजी प्रदर्शित झालेला ‘मुंज्या’ चांगली कमाई करताना दिसला. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित या सिनेमाने ४ दिवसात २४.१५ कोटींची कमाई केली आहे. मात्र ‘शैतान’नंतर कोणताच सिनेमा बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई करू शकलेला नाही. बॉलिवूडच नव्हे तर दाक्षिणात्य चित्रपटही चालत नाही आहेत. त्यामुळे आता ‘चंदू चॅम्पियन’कडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. ‘मुंज्या’ कार्तिक आर्यनच्या या सिनेमाला तगडी टक्कर देईल का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

‘भूल भुलैया २’नंतर आलेले चित्रपट आपटले

कार्तिकने २०२२ मध्ये ‘भूल भुलैया २’ हा हिट सिनेमा दिला. मात्र त्यानंतर आलेले ‘शहजादा’ आणि ‘सत्यप्रेम की कथा’ बॉक्स ऑफिसवर अपेक्षेप्रमाणे चालले नाहीत. त्यामुळे ‘चंदू चॅम्पियन’ हिट होणे कार्तिकसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. जर या सिनेमाने ५-६ कोटींचे आगाऊ बुकिंग केले, तर १४ जून रोजी ओपनिंग डेला ‘चंदू चॅम्पियन’ १० कोटींचा टप्पा गाठू शकेल.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.