Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

PM Narendra Modi : समाजमाध्यमांवरुन ‘मोदी का परिवार’ आता हटवू शकता,नरेंद्र मोदींकडून समर्थकांना अवाहन

13

नवी दिल्ली : आपल्या तिसऱ्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळाची सुरुवात करताच मोदींनी आपल्या समर्थकांना अवाहन केले आहे.लोकसभा निवडणूकांदरम्यान लोकांना दिलेल्या मजबूत प्रतिसादाबद्दल पंतप्रधान मोदींनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. समर्थकांचे आभार मानत आपल्या X (ट्वीटर) पोस्ट मधून त्यांनी आपल्या समर्थकांना समाजमाध्यमांवरील वापरकर्त्यांच्या नावासमोर जोडलेले ‘मोदी का परिवार’ हे प्रत्यय काढण्याची विनंती केली आहे. समाजमाध्यमावरील आपल्या नावाचा डिस्प्ले जरी बदलला तरी देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील असलेले एक कुटुंब म्हणून आपले बंध अतुट असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

‘मोदी का परिवार’ मधून शक्ती मिळाली

लोकसभा निवडणूकांदरम्यान आपण वापरलेल्या या प्रतिकाने यशस्वीपणे एकतेचा आणि एकात्मतेचा संदेश दिला आहे असे म्हणत त्यांनी मंगळवारी X या माध्यमावर एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘संपूर्ण निवडणूक प्रचारादरम्यान देशभरातील लोकांनी समाजमाध्यमावर ‘मोदी का परिवार’ हे प्रतिक जोडून माझ्याप्रतीचं प्रेम व्यक्त केले. यातून मला खूप शक्ती मिळाली. भारताच्या जनतेने एनडीएला तिसऱ्यांदा बहुमत मिळवून दिले आहे. हा एकप्रकारचा विक्रम आहे आणि देशाच्या कल्याणाप्रती कार्यरत राहण्याचा जनादेश आहे.’
New CM Of Odisha: मोहन माझी ओडिसाचे नवे मुख्यमंत्री; राज्याला २४ वर्षानंतर मिळाले नवे नेतृत्व, CMच्या मदतीला दोन उपमुख्यमंत्री

समाजमाध्यमांवरुन मोदी का परिवार काढू शकता

मोदींनी या प्रतिकाद्वारे अभिप्रेत असलेला संदेश प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवल्याचे सांगत याचे श्रेय आपल्या समर्थकांना दिले आहे. आपल्या पोस्ट मध्ये त्यांनी पुढे म्हटले आहे की, ‘आपण सगळे एक परिवार आहोत हा संदेश अतिशय प्रभावीपणे पोहोचल्यामूळे मी पुनश्च एकदा भारतीयांचे आभार मानतो आणि त्यांना विनंती करतो की आपण आता आपल्या समाजमाध्यमांवरुन मोदी का परिवार काढू शकता. डिस्प्ले वरील नाव बदलले तरीही देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील असलेला एक परिवार म्हणून आपले बंध हे मजबूत आणि अतूट राहतील.’

‘मोदी का परिवार’ कुठून आलं ?

‘मोदी का परिवार’ या संबोधना मागे मोदी आणि त्यांचे विरोधक यांच्यातील शाब्दिक संघर्षाचा इतिहास आहे. लोकसभा निवडणूकांदरम्यान इंडिया आघाडीच्या मार्च महिन्यातील एका सभेमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर दिले होते. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदींच्या मातोश्रींच्या मृत्यूवेळी मोदींनी मुंडण न केलेबद्दल म्हटले होते की, ‘ते राम मंदीर बद्दल टेंभा मिरवतात पण ते खरे हिंदू नाहीत. हिंदू परंपरेनुसार आई-वडीलांच्या मृत्यूनंतर मुलाने मुंडण करायचे असते. पण मोदींनी ते केले नाही.’ तसेच प्रधानमंत्र्यांकडून केलेल्या घराणेशाहीच्या आरोपांवर त्यांनी म्हटले होते की,’ मोदी घराणेशाहीच्या राजकारणाबद्दल बोलतात पण घराणेशाहीचे राजकारण काय आहे ? मोदी तुम्ही स्पष्ट केले पाहिजे की तुम्हाला मुलं का नाहीत ?’

लालूंच्या या टीकेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. पंतप्रधान मोदींनी या टीकेला तेलंगाना मधील एका सभेतून जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की ‘ मी त्यांना सांगू इच्छितो की १४० करोड देशवासी माझे परिवार आहे. ज्यांचं कुणी नाही ते मोदीचे आहेत व मोदी त्यांचे आहेत. माझा भारत माझा परिवार आहे.’ मोदींच्या या भाषणानंतर विरोधकांना प्रत्युत्तरादाखल भाजपच्या सगळ्या समाजमाध्यमांवर ‘मोदी का परिवार’ हे अभियान भाजपकडून चालविण्यात आले. भाजप नेते,मंत्री,मुख्यमंत्री आणि कार्यकर्त्यांकडून आपल्या सोशल मिडीया हॅंडलवर आपल्या नावासमोर ‘मोदी का परिवार’ जोडण्यात आले होते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.