Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Fake Jewellery Alert: अमेरिकन महिलेची भारतात ६ कोटींची दागिने खरेदी; मायदेशी स्टॉल लावला अन् पायाखालची जमीन सरकली

8

ज्वेलर्स पितापुत्राने एका विदेशी महिलेला ६ कोटींचा गंडा घातला आहे. पितापुत्राने ३०० रुपयांचे बनावट दागिने चक्क ६ कोटीला विकल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. यातच त्यांनी महिलेला या खोट्या दागिन्यांचे हॉलमार्क सर्टिफिकेट सुद्धा देऊ केले होते.

अमेरिकेतील नागरिक असलेल्या चेरिश हिने दोन वर्षांपूर्वी राजस्थानमधील गोपालजी का रस्त्यावर स्थित एका ज्वेलर्स दुकानातून दागिने खरेदी केले, ज्यावर तिने ६ कोटी रुपये खर्चिले. हे दागिने घेऊन ती मायदेशी गेली. तेथील एका प्रदर्शनात तिने या दागिन्यांना प्रदर्शित केले, तेव्हा तिला ते दागिने खोटे असल्याचे समजताच धक्का बसला. वेळ न दवडता ती तात्काळ जयपूरमध्ये दाखल आली आणि ज्वेलर्सच्या दुकान मालकाकडे खोट्या दागिन्यांबद्दल तक्रार केली.
२८ वर्षीय भारतीय तरुणाला कॅनडामध्ये गोळ्या घालून संपवलं; टार्गेट किलिंगचा संशय, चार जणांना अटक
दुकानमालकाने देखील त्या दागिन्यांच्या शुद्धतेची तपासणी करण्यासाठी दागिने इतर दुकानांत पाठवले, ज्यामध्ये दागिने खोटे असल्याचे समजले. चेरिशने लगेचच या घटनेची अमेरिकेच्या दुतावासाला माहिती दिली होती.

ज्वेलर्स राजेंद्र सोनी आणि त्यांचा मुलगा गौरव सोनी यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या अनेक कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर “पोलिसांनी दागिने चाचणीसाठी पाठवले होते, दागिन्यांमधील हिरे चंद्रमणीचे असल्याचे आढळले. दागिन्यांमध्ये सोन्याचे प्रमाण 14 कॅरेट असणे गरजेचे असताना ते फक्त दोन कॅरेटचे होते. आरोपी ज्वेलर्सने उलट तक्रार दाखल करुन दावा केला की, महिला त्यांच्या दुकानातून दागिने घेऊन पळून गेली होती पण आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा ज्वेलर्सचा दावा खोटा असल्याचे निष्पन्न झाले आहे.’ अशी माहिती देखील जयपूरचे डीसीपी बजरंग सिंह शेखावत यांनी दिली आहे.
खोदकामादरम्यान असं काही सापडलं की सारे हादरले, ८० वर्षांपूर्वीचं धडकी भरवणारं रहस्य उघड
माध्यमांशी बोलताना चेरिश म्हणाली, ‘गौरव सोनी आणि त्याचे वडील यांनी माझी फसवणूक केली. त्यांनी मला १४ कॅरेटऐवजी ९ कॅरेट सोन्याच्या प्लेट पाठवल्या. मला खऱ्या हिऱ्याऐवजी मूनस्टोन मिळाला. मूनस्टोन खरेदी करणारे सुमारे १० डिझाइनर त्यांच्या फसवणुकीच्या जाळ्यात अडकले आहेत, ज्यांना बनावट प्रमाणपत्र देण्यात आली आहेत.

सदर प्रकरणातील आरोपी ज्वेलर्स फरार आहेत, मात्र बनावट हॉलमार्क प्रमाणपत्र देणाऱ्या नंदकिशोरला अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी गौरव सोनी याच्याविरुद्ध लुकआउट नोटीस देखील जारी करण्यात आली आहे. गौरव सोनी आणि राजेंद्र सोनी यांच्यावर कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. तर अमेरिकन महिलेच्या तक्रारीनंतर हे बनावट दागिने विक्रीचे जाळे आणखी मोठे असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.