Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Xiaomi 14 Civi ची किंमत
Xiaomi 14 Civi च्या 8GB रॅम व 256GB व्हेरिएंटची किंमत 39,999 रुपये आहे. तर 12GB रॅम व 512GB व्हेरिएंटची किंमत 44,999 रुपये आहे. हा क्रूज ब्लू, माचा ग्रीन आणि शेडो ब्लॅक या तीन कलर ऑप्शन्समध्ये आला आहे. फोन Flipkart, Mi.com, Mi Home स्टोर, आणि Xiaomi च्या रिटेल पार्टनर कडून विकत घेता येईल. पहिला सेल 20 जूनला होईल. ICICI बँक कार्डच्या माध्यमातून फोन खरेदी केल्यास 3000 रुपयांचा डिस्काउंट मिळेल.
Xiaomi 14 Civi चे स्पेसिफिकेशन
फोनमध्ये 6.55 इंचाचा 1.5K (1,236×2,750 पिक्सल) कर्व्ड AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 120Hz रिफ्रेश रेट, 240Hz टच सॅम्पलिंग रेट, 3000 निट्स पीक ब्राइटनेस, HDR10+ आणि Dolby Vision ला सपोर्ट करतो. यावर Gorilla Glass Victus 2 ची सुरक्षा आहे.
Xiaomi 14 Civi फोनमध्ये 4nm प्रोसेसिंगवर आधारित Snapdragon 8s Gen 3 SoC आहे. सोबत 12GB LPDDR5 RAM आणि 512GB UFS 4.0 स्टोरेज देण्यात आली आहे. स्मार्टफोन Android 14 आधारित HyperOS वर चालतो. Xiaomi 14 Civi फोनमधील 4,700mAh ची बॅटरी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Xiaomi 14 Civi फोनमध्ये Leica ब्रँडेड ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यात ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशनसह 50 मेगापिक्सलचा Light Fusion 800 इमेज सेन्सर आहे. त्याचबरोबर 50 मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा आणि 12 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरा देण्यात आला आहे. फ्रंटला यात 32+32 मेगापिक्सलचा ड्युअल सेल्फी कॅमेरा आहे.
कनेक्टिव्हिटीसाठी 5G, Wi-Fi 6, NFC, Bluetooth 5.4, GPS, Galileo, GLONASS, Beidou, NFC, आणि USB Type-C पोर्टचा समावेश आहे. तसेच एक्सिलेरोमीटर, अँबियंट लाइट सेन्सर, ई-कम्पास, प्रॉक्सिमिटी सेन्सर आणि IR ब्लास्टर देखील आहे. फोनमध्ये स्टीरियो स्पिकर्स Dolby Atmos सपोर्टसह देण्यात आले आहेत.