Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

महागड्या फोनमधील फिचर स्वस्तात देणार Samsung; जबरदस्त कॅमेऱ्यासह येतोय नवीन फोन

11

Samsung Galaxy S24 FE स्मार्टफोन संबंधित माहिती लिक्सच्या माध्यमातून समोर आली आहे. हा Samsung Galaxy S24 सीरीजचा सर्वात स्वस्त मॉडेल असू शकतो. हा फोन गेल्यावर्षी लाँच झालेल्या Galaxy S23 FE चा अपग्रेड व्हर्जन असेल. लेटेस्ट लीक रिपोर्टमध्ये फोनच्या कॅमेरा फीचर्सची माहिती समोर आली आहे. त्यानुसार, फोन 6.1 इंचाच्या डिस्प्लेसह येऊ शकतो. तसेच यात Exynos 2400 किंवा Snapdragon 8 Gen 3 प्रोसेससरचा वापर केला जाईल. फोनची बॅटरी 4,500mAh ची असू शकते.

GalaxyClub च्या लेटेस्ट लीक रिपोर्टमध्ये Samsung Galaxy S24 FE स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याची माहिती देण्यात आली आहे. लीकनुसार, हा फोन 50MP ISOCELL GN3 प्रायमरी कॅमेऱ्यासह येईल. हा कॅमेरा सेन्सर Samsung Galaxy S24 सारखा असेल. सध्या या रिपोर्टमध्ये फक्त एका कॅमेरा सेन्सरची माहिती देण्यात आली आहे. हा फोन याआधी देखील अनेकदा लीक्सच्या माध्यमातून समोर आला आहे.Nokia Lumia सारखी डिजाइन असलेला फोन येतोय; मिळेल 108MP चा कॅमेरा

Samsung Galaxy S24 FEचे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

जुन्या लीक रिपोर्टनुसार, Samsung Galaxy S24 FE फोनमध्ये 6.1 इंचाचा AMOLED डिस्प्ले दिला जाईल. याआधी Galaxy S23 FE फोन कंपनीनं 6.4 इंचाच्या डिस्प्लेसह सादर करण्यात आला होता. तसेच हा फोन Exynos 2400 किंवा Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसरसह येईल, सोबत 12GB LPDDR5X RAM व 256GB UFS 3.1 स्टोरेज दिली जाऊ शकते. लेटेस्ट लीक रिपोर्टमध्ये 50MP ISOCELL GN3 प्रायमरी कॅमेऱ्याची माहिती समोर आली आहे. हा फोन 4,500mAh च्या बॅटरीसह येऊ शकतो. सध्या फोनच्या फास्ट चार्जिंगची माहिती मिळाली नाही.

कधी येणार बाजारात

Samsung नं Galaxy S24 FE फोनच्या लाँच बाबत अधिकृतपणे काहीही सांगितलेलं नाही. हा फोन आतापर्यन्त फक्त लीक्सच्या माध्यमातून समोर आला आहे. कंपनी हा फोन यंदा तिसऱ्या तिमाहीत सादर करू शकते, अशी चर्चा आहे. तसेच लवकरच बाजारात Samsung Galaxy Z Fold 6 आणि Galaxy Z Flip 6 येऊ शकतात, अश्या बातम्या देखील आल्या आहेत.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.