Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Fact Check : नितीश कुमार इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटले? व्हायरल व्हिडिओचं सत्य काय?

10

नवी दिल्ली : सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, या व्हिडिओमध्ये जेडीयू प्रमुख नितीश कुमार इंडिया आघाडीच्या नेत्यांसोबत भेटताना दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करुन असा दावा केला जात आहे, की हा व्हिडिओ आताचा असून नितीश कुमार पुन्हा इंडिया आघाडीसोबत गेले आहेत. मात्र, पडताळणीत हा व्हिडिओ दिशाभूल करणारा असल्याचं समोर आलं आहे.

सोशल मीडियावर काय केला जातोय दावा?

मोदी सरकार ३.० च्या स्थापनेबद्दल अंदाज व्यक्त करताना, ट्विटरवर एका युजरने लिहिलंय, काँग्रेस कार्यालयात हा खेळ अजून खेळायचा आहे. इंडिया सरकार…. ही पोस्ट एक्सवर पाच लाखांहून अधिक वेळा पाहिली गेली आहे.

navbharat-times-110903998.

अशाप्रकारच्या दाव्यांचे आर्काइव इथे, इथे आणि इथे पाहता येऊ शकतात.

कशी केली व्हिडिओची पडताळणी?

व्हायरल व्हिडिओच्या पडताळणीसाठी संबंधित कीवर्ड “nitish tejashwi rahul gandhi meet” गुगल सर्च केलं. इथे यूट्यूबवर एक व्हिडिओ मिळाला. हा व्हिडिओ मिडडे इंडियाच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर होता.

हा व्हिडिओ १२ एप्रिल २०२३ रोजी अपलोड करण्यात आला होता. त्यांनी टायटलमध्ये लिहिलेलं, “नितीश कुमार, तेजस्वी यादव यांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी : विरोधकांना एकत्र करण्यासाठी ऐतिहासिक पाऊल”

व्हिडिओमध्ये नितीश कुमार यांचं लाल पगडी घातलेल्या व्यक्तीने स्वागत केलेलं दिसतं. हे दृश्यही व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं. तेजस्वी यादव, नितीश कुमार आणि खर्गे यांच्यासोबत राहुल गांधी एका फोटोसाठी पोज देताना दिसत आहेत.
Fact Check : पंतप्रधान मोदींचा त्यांच्या आईसोबत बालपणीचा फोटो व्हायरल? जाणून घ्या फोटोचं सत्य
त्याशिवाय NDTV चा रिपोर्ट मिळाला. त्यात असं लिहिलंय, की २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला सामोरं जाण्यासाठी संयुक्त विरोधी आघाडी तयार करण्यासाठी जेडीयू, आरएलडी आणि काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली.

निष्कर्ष

व्हायरल झालेल्या व्हिडिओची चौकशी केल्यानंतर हा व्हिडिओ आताचा नसल्याचं स्पष्ट झालं आहे. हा व्हिडिओ एप्रिल २०२३ चा आहे, ज्यावेळी नितीश कुमार यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेट घेतली होती. मात्र हा व्हिडिओ आताचा असल्याचं सांगत दिशाभूल केली जात आहे.

(This story was originally published by The Quint, and republished by MT as part of the Shakti Collective.)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.