Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
लवकरच युजर्सना यूट्यूबवर गुगल लेन्स बटणाचा ऑप्शन मिळणार आहे. Android युजर्ससाठी YouTube ॲपमधील सर्च बारच्या टॉप पॅनेलमध्ये Google चे व्हिज्युअल लुकअप टूल जोडले जात आहे.
YouTube मध्ये Google Lens बटण कसे काम करेल?
Google लेन्स बटणासह, YouTube युजर्स कोणत्याही वस्तूचा फोटो सर्च करू शकतील आणि व्हिडिओ-स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर आपल्याला हवे ते सर्च करू शकतील. हे फीचर सध्या निवडक युजर्ससाठी आणले जात आहे. म्हणजेच हे फीचर हळूहळू यूट्यूबवर पाहता येणार आहे.
YouTube ॲप अपडेट केल्यानंतर मिळेल हे टूल
9to5Google च्या रिपोर्टनुसार, YouTube ॲपच्या अपडेटसह, Google Lens बटण त्यामध्ये दिसेल. हे बटण टाइप करण्याऐवजी इमेजसह व्हिडिओ शोधण्यासाठी वापरले जाईल. मायक्रोफोन बटणाच्या मदतीने, युजर्स बोलून कोणताही काहीही सर्च करू शकतो.
Google Lens कसे काम करते?
गुगल लेन्सबद्दल सांगायचे तर, या टूलच्या सहाय्याने कोणत्याही ऑब्जेक्ट फोटोवर क्लिक केल्यानंतर ते इंटरनेटवर त्याच्याशी मिळतेजुळते रिजल्ट्स शोधले जातात. या टूलच्या मदतीने 100 हून अधिक भाषा रिअल टाइममध्ये ट्रान्सलेट केल्या जाऊ शकतात. हे साधन ऑप्टिकल कॅरेक्टर फंग्शनॅलिटीसह येते. या फिचरसह इमेजेसमधले टेक्स्ट देखील ओळखले जाऊ शकते.