Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
जुना वॉरंटीमध्ये डिव्हाइसवर फिजिकल डॅमेज किंवा इतर कोणतेही डाग नसतील तर हेअरलाइन क्रॅक वॉरंटीमध्ये कव्हर केला जात होता. म्हणजे जुन्या वॉरंटीचा अर्थ असा होता की जर तुमच्या फोन किंवा वॉचमध्ये सामान्य क्रॅक असेल तर तुम्ही तो मोफत वॉरंटी अंतगर्त ठीक करू शकता.
ग्राहकांना द्यावे लागतील पैसे
आता अॅप्पलनं आपल्या पॉलिसीमध्ये बदल केला आहे. जर तुमच्या डिव्हाइसमध्ये कोणताही क्रॅक मिळाला तर तो डिवाइस वॉरंटीमध्ये कव्हर केला जाणार नाही. आता ही समस्या अॅक्सिडेंटल डॅमेज अंतगर्त रिपेअर केली जाईल. याचा अर्थ असा की तुम्हाला हे रिपेअर करण्यासाठी पैसे द्यावे लागतील.
या पॉलिसीची माहिती अॅप्पल स्टोर आणि अॅप्पल ऑथराइज्ड सर्व्हिस प्रोवाइड्सना एक आठवड्यापूर्वी देण्यात आली होती. सर्व्हिस सेंटर्स आता डिव्हाइसवर सिंगल क्रॅक असल्यास तो अॅक्सिडेंटल डॅमेज अंतगर्त रिपेअर करत आहेत. यासाठी ग्राहकांना पैसे द्यावे लागतील.
अशी करता येईल बचत
iPads आणि Macs च्या वॉरंटीवर अजूनही सिंगल हेअरलाइन क्रॅक कव्हर केला जात आहे. अॅप्पलनं आपल्या पॉलिसीमध्ये बदल करण्यामागे कोणतंही कारण दिलेलं नाही. हा बदल खूप मोठा आहे कारण याचा थेट परिणाम ग्राहकांवर पडणार आहे. त्यांना आता छोट्याश्या क्रॅकसाठी पैसे खर्च करावे लागतील जेव आधी वॉरंटीमध्ये कव्हर केला जात होता.
विशेष म्हणजे Apple च्या वेबसाइटवर तुम्हाला स्क्रीन रिप्लेसमेंटची माहिती मिळेल. त्यामुळे जर तुम्ही अॅप्पलचा डिवाइस खरेदी करत असाल तर Apple Protection Plus देखील खरेदी करा. ही अॅप्पलची एक्सटेंडेड वॉरंटी आहे, ज्यात अॅक्सिडेंटल क्रॅक देखील कव्हर केले जातात, परंतु यात देखील काही अटी आहेत त्या एकदा वाचून घ्या.