Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मेटा-मालकीच्या इन्स्टंट मेसेजिंग ॲपला आणखी उपयुक्त बनवण्यासाठी WhatsApp गेल्या काही काळापासून अनेक नवीन फीचर आणत आहे. आत्ताही व्हॉट्सॲप एक नवीन फीचरवर काम करत आहे या फीचरच्या मदतीने जुन्या स्मार्टफोनवरून नवीन फोनमध्ये चॅट हिस्टरी अगदी सहज ट्रान्सफर करता येते.
WhatsApp ट्रान्सफर चॅट हिस्टरी फीचर
WABetainfo च्या ताज्या रिपोर्टनुसार, WhatsApp चॅट ट्रान्सफर फीचरवर काम करत आहे. अँड्रॉइड 2.24.13.6 अपडेटसाठी व्हॉट्सॲप बीटाने हे उघड केले आहे की कंपनी जुन्या फोनवरून चॅट हिस्टरी ट्रान्सफर करण्यासाठी एक नवीन फीचर आणण्याची योजना आखत आहे. सध्या, हे फीचर डेव्हलपमेंट फेजमध्ये आहे.
फक्त QR कोड स्कॅन करून करा चॅट हिस्टरी ट्रान्सफर
या फीचरच्या मदतीने, युजर्स फक्त QR कोड स्कॅन करून जुन्या फोनवरून संपूर्ण चॅट हिस्टरी ट्रान्सफर करू शकतील. यासाठी त्यांना गुगल ड्राइव्हची गरज भासणार नाही. रिपोर्टमध्ये दिलेला स्क्रीनशॉट स्पष्टपणे दर्शवतो की व्हॉट्सॲपचे हे आगामी फीचर कसे काम करेल.
QR कोड स्कॅन करावा लागेल
रिपोर्टनुसार, व्हॉट्सॲप सध्या एका नवीन सेक्शनवर काम करत आहे, ज्याद्वारे यूजर्स त्यांच्या जुन्या फोनवरून चॅट हिस्टरी सहजपणे ट्रान्सफर करू शकतात. हे फीचर युजर्सना इतर कोणत्याही पद्धतीवर अवलंबून न राहता चॅट हिस्टरी ट्रान्सफर करण्याची परमिशन देईल. स्क्रीनशॉटमध्ये QR कोड दिसत आहे. असे देखील लिहिले आहे की युजर्स त्यांच्या नवीन फोनचा कॅमेरा वापरून जुन्या फोनचा QR कोड स्कॅन करू शकतात तथापि, जुना फोन Android असावा कि iOS हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हे आगामी फीचर सध्या डेव्हलपमेंट फेजमध्ये आहे. हे भविष्याती अपडेटसह प्रसिद्ध केले जाईल. प्रथम ते बीटा युजर्सना चाचणीसाठी देण्यात येईल. त्यानंतर सर्व युजर्स ते स्टेबल व्हर्जनवर वापरण्यास सक्षम असतील. यामुळे चॅट्स ट्रान्सफर करणे खूप सोपे होईल.