Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Semi Automatic कि Fully Automatic; कोणते वॉशिंग मशीन देईल तुम्हाला दीर्घकाळ साथ, जाणून घ्या सविस्तर

13

बाजारात तुम्हाला सेमी ऑटोमॅटिक आणि फुल्ली ऑटोमॅटिक असे दोन्ही प्रकारचे वॉशिंग मशीन मिळतील. तुम्हाला ऑटोमॅटिकमध्येही (फ्रंट लोड आणि टॉप लोड) असे दोन पर्याय मिळतील. कुठले वॉशिंग मशिन तुम्हाला दीर्घकाळ साथ देईल हे अनेक घटकांवर अवलंबून आहे.

मशीनची गुणवत्ता

स्वस्त आणि लोकल ब्रँडपेक्षा ब्रँडेड आणि चांगल्या प्रकारे बनवलेली मशीन अधिक टिकाऊ असतात.

मेंटेनन्स

वॉशिंग मशीनचा वापर आणि मशीनची देखभाल या दोन गोष्टींवर तुमचे मशीन जास्त काळ टिकेल की नाही हे अवलंबून आहे .

सेमी ऑटोमॅटिक फायदे आणि तोटे

फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, सेमी-ऑटोमॅटिक वॉशिंग मशीनची किंमत कमी आहे. याशिवाय सेमी ऑटोमॅटिक मशिन पाणी आणि वीज कमी वापरते. ऑटोमॅटिक मशीनच्या तुलनेत या मशीनची दुरुस्ती करण्यासाठी कमी खर्च येतो.
तोट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, ऑटोमॅटिक मशीनच्या तुलनेत सेमी-ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन वापरण्यास कमी सोयीस्कर आहेत. कपडे धुताना एका भागातून कपडे काढून दुसऱ्या स्पिन एरियात धुण्यासाठी व सुकविण्यासाठी ठेवावे लागतात.

ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन फायदे आणि तोटे

फायद्यांबद्दल सांगायचे तर, सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीनच्या तुलनेत ऑटोमॅटिक मशीन वापरणे अधिक सोयीचे आहे, हे मशीन कपडे धुण्याचे आणि कोरडे करण्याचे काम स्वतः करते.
तोट्यांबद्दल बोलायचे तरऑटोमॅटिक वॉशिंग मशीनची किंमत सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीनपेक्षा जास्त आहे. याशिवाय ऑटोमॅटिक वॉशिंग मशिन जास्त प्रमाणात पाणी आणि वीज वापरते. एवढेच नाही तर ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन दुरुस्त करण्यासाठी अधिक पैसे खर्च करावे लागतात.

‘सॅमसंग’ चे ॲडव्हान्स फीचरसह ‘एआय इकोबबल’ फुली ऑटोमॅटिक फ्रण्‍ट लोड वॉशिंग मशीन

‘सॅमसंग’ या मोठ्या कस्टमर इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रॅण्‍डने ‘एआय इकोबबलTM फुली ऑटोमॅटिक फ्रण्‍ट लोड’ हि वॉशिंग मशिन्‍सची नवीन रेंज लाँच केली आहे. वॉशिंग मशिन्‍सची ही नवीन रेंज एआय वॉश, क्‍यू-ड्राइव्‍हTM व ऑटो डिस्‍पेन्‍स अशी इम्प्रूव्ह फीचर असलेली ११ किग्रॅ सेक्शनमधील पहिली रेंज आहे. हे मशीन जवळपास ७० टक्‍के अधिक एनर्जी एफिशिअंट आहे. या मशीनचे महत्वाचे फीचर म्‍हणजे ‘क्विकड्राइव्‍ह’, जे वॉशिंगचा वेळ जवळपास ५० टक्‍क्‍यांनी कमी करू शकते. ‘क्‍यू-बबल’ तंत्रज्ञानामध्‍ये अधिक प्रमाणात शक्तिशाली बबल्‍स तयार करण्‍यासाठी अतिरिक्‍त वॉटर शॉट्ससह डायनॅमिक ड्रम रोटेशन आहे. यामुळे डि‍टर्जंट जलदपणे कपड्यांमध्‍ये सामावून जाते आणि कपडे जलदपणे व सौम्‍यपणे धुतले जातात.डिजिटल इन्‍व्‍हर्टर टेक्‍नॉलॉजी वॉशिंग मशिन्‍सच्‍या अधिक शक्तिशाली परफॉर्मन्‍ससाठी प्रबळ चुंबकांचा वापर करते, ज्‍यामुळे वीजेचा कमी वापर होतो.



Source link

Leave A Reply

Your email address will not be published.