Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Fact Check : आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी मणिपूर हिंसेसाठी मोदींना जबाबदार ठरवलं? जाणून घ्या व्हायरल पोस्टचं सत्य

12

नवी दिल्ली : देशात तिसऱ्यांदा मोदी सरकार आलं आहे. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) प्रमुख मोहन भागवत यांच्या नावाने पोस्ट व्हायरल केली जात आहे. पोस्टमध्ये असा दावा केला जात आहे, की मणिपूरमध्ये १० वर्षे शांतता होती, मात्र मोदी सरकार आल्यानंतर तेथे हिंसाचार उसळला, असा दावा मोहन भागवत यांनी केल्याचं म्हटलं जात आहे. मात्र विश्वास न्यूजने केलेल्या तपासणीत हा दावा दिशाभूल करणारा असल्याचं समोर आलं आहे.

व्हायरल पोस्टमध्ये काय म्हटलंय?

सोशल मीडियावर मोहन भागवत यांच्या नावे केला जाणारा दावा व्हायरल होत आहे. फेसबुकवर सुनील यादव नावाच्या एका युजरने पोस्टमध्ये लिहिलंय, की ‘१० वर्षांपूर्वी मणिपूरमध्ये शांतता होती. मोदी सरकार आल्यानंतर तिथे अचानक हिंसाचार उसळला – मोहन भागवत आरएसएस प्रमुख’

navbharat-times-110947959.

फेसबुक युजरने पोस्टमध्ये पुढं लिहिलंय की, ‘आरएसएसचे प्रमुख गाढ झोपेत होते. निवडणुकीचे निकाल आणि एनडीए सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी तोंड उघडलं आहे. ते आरएसएसचे शेवटचे राजा आहेत. त्यांच्या सेवेत प्रथमच NSG तैनात करण्यात आलं आहे. आरएसएस मोठमोठ्या वाड्यांमध्ये कार्यालयं उघडत आहे. आरएसएसचे लोक खासगी जहाजातून प्रवास करतात, आता त्यांना गुरुदक्षिणेची गरज नाही. संघ परिवार सत्ता उपभोगत आहे.’

कशी केली व्हायरल पोस्टची पडताळणी?

व्हायरल पोस्टमध्ये केलेल्या दाव्याच्या पडताळणीसाठी विश्वास न्यूजने यासंबंधित कीवर्ड गुगल सर्च केले. त्यानंतर RSS च्या एक्स अकाऊंटवर १० जून रोजी पोस्ट केलेली भागवत यांचा एक व्हिडिओ मिळाला. या व्हिडिओमध्ये भागवत सांगतात, ‘एक वर्षापासून मणिपूर शांततेच्या प्रतिक्षेत आहे. त्याआधी १० वर्ष शांत होता. जुनं बंदुकीचं कल्चर संपलं असल्याचं वाटत होतं, मात्र अचानक तिथे उफाळलेली वादाची आह अजूनही धगधगत आहे. याकडे कोण लक्ष देणार? त्याचा प्राधान्याने विचार करणं आपलं कर्तव्य आहे.’

navbharat-times-110947970.

त्याशिवाय हा व्हिडिओ न्यूज एजेन्सी एएनआयच्या एक्स हँडलवर मिळाला, जो १० जून रोजी पोस्ट करण्यात आला होता. पोस्टमध्ये हा व्हिडिओ नागपूरमध्ये झालेल्या कार्यक्रमाचा असल्याचं सांगण्यात आलं आहे. व्हिडिओमध्ये मोहन भागवत यांचं हेच विधान ऐकू येतं, मात्र या व्हिडिओमध्ये कुठेही ते मोदी सरकारचं नाव घेताना दिसत नाहीत.

navbharat-times-110947975.

दैनिक जागरणच्या एका रिपोर्टमध्ये मोहन भागवत यांचं विधान वाचता येऊ शकतं. हा रिपोर्ट १० जून रोजी छापण्यात आला होता. रिपोर्टनुसार, संघ प्रमुखांनी डॉ. हेगडेवार स्मृती भवन परिसरात आयोजित ‘कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीय’या कार्यक्रमाच्या समारोप कार्यक्रमात हे विधान केलं होतं. रिपोर्टमध्ये असंही लिहिलंय, की मागील वर्षी मणिपूरमध्ये दोन समुदायामध्ये हिंसाचार झाला होता. या हिंसेत आतापर्यंत जवळपास २०० लोकांचा मृत्यू झाला आहे.

navbharat-times-110948013.

Fact Check : नितीश कुमार इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटले? व्हायरल व्हिडिओचं सत्य काय?
आरएसएसचे माजी राज्य प्रचारक राजीव तुली यांनीही व्हायरल झालेल्या पोस्टचं खंडन केलं आहे. ते म्हणाले, ‘व्हायरल झालेला दावा चुकीचा आहे. गेल्या नऊ-दहा वर्षांपासून तिथे शांतता होती, मात्र गेल्या वर्षभरापासून हिंसाचार सुरू असल्याचं’, ते म्हणाले होते.

निष्कर्ष

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा विपर्यास करून सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. विश्वास न्यूजच्या तपासात व्हायरल दावा खोटा असल्याचं समोर आलं आहे. त्यांनी मणिपूर हिंसाचाराबद्दल विधान केलं होतं, मात्र त्यात कुठेही मोदी सरकारबद्दल वक्तव्य करण्यात आलेलं नाही.

(This story was originally published by Vishwas News, and republished by MT as part of the Shakti Collective.)



Source link

Leave A Reply

Your email address will not be published.