Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Samsung Galaxy Watch FE किंमत
Samsung Galaxy Watch FE कंपनीने Galaxy Watch 4 चे लाईट व्हर्जन म्हणून लॉन्च केले आहे. त्याची किंमत 199 डॉलर (अंदाजे16,000 रुपये ) आहे. 24 जूनपासून या स्मार्टवॉचची विक्री सुरू होणार आहे. हे ब्लॅक, पिंक, गोल्डन आणि सिल्व्हर रंगाच्या प्रकारांमध्ये खरेदी केले जाऊ शकते.
Samsung Galaxy Watch FE फीचर्स
- Samsung Galaxy Watch FE मध्ये 1.2 इंच आकारमानाचा सुपर AMOLED डिस्प्ले आहे.
- याचे रिझोल्यूशन 396 x 396 पिक्सेल आहे.
- डिस्प्लेवर सॅफायर ग्लास प्रोटेक्शन देण्यात आले आहे.
- कंपनीने हे स्मार्टवॉच एकाच 40 मिमी प्रकारात लॉन्च केले आहे.
- यात Exynos W920 चिपसेट आहे.
- त्याची रॅम 1.5GB आणि स्टोअरेज 16GB आहे.
- हे Wear OS वर चालते. ज्याच्या वर कंपनीचा One UI 5 Watch लेयर देण्यात आला आहे.
- स्मार्टवॉच टिकाऊ बनवण्यासाठी कंपनीने सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी त्याला IP68 रेटिंग आहे.
- तर स्विमिंग करतेवेळी स्मार्टवॉच खराब होण्यापासून वाचवण्यासाठी त्याला 5ATM वॉटर रेझिस्टन्स देण्यात आला आहे. याशिवाय, यात MIL-STD-810H सर्टिफिकेशन देखील आहे.
Samsung Galaxy Watch FE कनेक्टिव्हिटी
- कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचे झाले तर यात ब्लूटूथ 5.3 व्हर्जन सपोर्ट आहे.
- याशिवाय यामध्ये वाय-फाय, एनएफसी आणि मल्टिपल सॅटेलाइट सिस्टीम देखील देण्यात आली आहे, ज्या अंतर्गत GPS/Glonass/Beidou/Galileo सारखी कनेक्टिव्हिटी फीचर्स समाविष्ट आहेत.
हेल्थ फीचर्सना सपोर्ट
- हे अनेक हेल्थ फीचर्सना देखील सपोर्ट देते. यामध्ये 100 हून अधिक वर्कआउट्सचा फॉलो अप घेतला जाऊ शकतो.
- स्लीप ट्रॅकिंग, स्लीप कोचिंग सारखे फीचर्सही आहेत.
- हे हार्ट रेटचे निरीक्षण करू शकते.
- याशिवाय ब्लडप्रेशर मॉनिटरिंग फीचरही स्मार्टवॉचमध्ये देण्यात आले आहे.
- यात एक्सीलरोमीटर, बॅरोमीटर, गायरो सेन्सर, जिओ मॅग्नेटिक सेन्सर यांसारख्या सर्व महत्त्वाच्या सेन्सर्सना सपोर्ट आहे.