Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

PM Narendra Modi’s Advisor : मोदींचे खास डोभाल, मिश्रांना संपूर्ण देश ओळखतो; पण हे दोघे आहेत पंतप्रधानांचे राईट हँड

11

नवी दिल्ली : तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या नरेंद्र मोदींनी आपल्या नव्या कार्यकाळातही महत्वपूर्ण आणि विश्वासू सहकाऱ्यांना सल्लागारपदी नियुक्त केले आहे.यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी अजित डोभाल यांची तिसऱ्यांदा नियुक्ती करण्यात आली आहे.तर मोदींचे २०१४ पूर्वीपासूनचे विश्वासू पी.के मिश्रा यांची मुख्य सल्लागार म्हणून पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे.मोदींच्या अत्यंत विश्वासू व्यक्तींमध्ये दोन्ही चेहरे बऱ्याच जणांना परिचित आहेत परंतु या दोघांव्यतिरिक्त आणखी दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हे अधिकारी देखील मोदींचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात.तरुण कपूर आणि अमित खरे यांची पंतप्रधान मोदींच्या सल्लागार पदी दोन वर्षांसाठी निवड करण्यात आली आहे.यातील खरे हे बहुचर्चित चारा घोटाळा उघड करणारे अधिकारी म्हणून ओळखले जातात तर तरुण कपूर हे सोलर मॅन म्हणून परिचित आहेत.
RSS Chief Mohan Bhagwat : ‘अहंकारावरुन’ कान टोचताच..भाजपचा एक मोठा चेहरा सरसंघचालकांच्या भेटीला

कोन आहेत अमित खरे ?

पंतप्रधान मोदींचे सल्लागार म्हणून नियुक्त केलेले अमित खरे यांनी १९७७ मध्ये रांची येथील केंद्रीय विद्यालयातून आपली मॅट्रीक परीक्षा उत्तीर्ण केली.त्यावेळी ते आपल्या शाळेत प्रथम आले होते.त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण दिल्लीतील सेंट स्टीफंन्स कॉलेज मधून पूर्ण केले.पुढे त्यांनी भारतीय प्रबंधन संस्थान IIM अहमदाबाद येथून पदवीचे शिक्षण पूर्ण केले.यानंतर ते १९८५ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगातून आयएएस झाले.अमित खरे हे एक शिस्तबद्ध अधिकारी म्हणून परिचित आहेत.बहुचर्चित चारा घोटाळा बाहेर आणण्यामध्ये त्यांची मोलाची भूमिका होती ज्यामध्ये लालू प्रसाद यादव यांना तुरुंगात जावे लागले होते.

अमित खरे यांनी केंद्रात मानव संसाधन मंत्रालयातही काम केले आहे.अमित खरे यांचे मोठे भाऊ देखील निवृत्त आयएएस अधिकारी आहेत.तसेच त्यांच्या पत्नी निधी खरे १९९२ बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत.सध्या ते केंद्र सरकारच्या खाद्यान्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयात अपर सचिव पदी नियुक्त आहेत.चारा घोटाळा समोर आणल्यानंतर ते माध्यमांतून चर्चेत आले होते.काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये त्यांनी म्हटले होते की त्यांना कशाचीही भिती नव्हती आणि त्यांना कधीही कुठले प्रलोभनही दिले गेले नव्हते.

कोण आहेत तरुण कपूर ?

तरुण कपूर हे सुद्धा पंतप्रधान मोदींच्या विश्नासू व्यक्तींपैकी एक आहेत.तरुण हे हिमाचल प्रदेशचे एक निवृत्त आयएएस अधिकारी आहेत.तरुण कपूर यांना सोलर मॅन या नावानेही ओळखले जाते.त्यांनी हिमाचल प्रदेशामध्ये सौर उर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रचंड काम केले होते.केंद्र शासनाने आणलेली मोफत सौर वीज योजना देखील तरुण यांनी बनवली आहे.१९८७ च्या बॅचचे तरुण कपूर हे काही वर्षांपूर्वीच निवृत्त झाले आहेत.२०१९ पर्यत ते हिमाचल प्रदेश मध्ये कार्यरत होते.यासोबतच तरुण यांनी दिल्ली जल आयोगामध्ये व पेट्रोलीयम मंत्रालयात देखील काम केले आहे.आता ते पुन्हा पंतप्रधान मोदींचे सल्लागार बनले आहेत.

तरुण कपूर शिमला येथील लांगवूड भागातील रहिवासी आहेत.त्यांनी आपले शिक्षण मंडीतील पालमपूर येथून पुर्ण केले.तरुण यांनी सौर विभागामध्येही काम केले आहे.त्यांनी केंद्रातील नवीकरणीय उर्जा मंत्रालयातही संयुक्त सचिव म्हणून काम पाहिले व सौर उर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी ब्लू प्रिंट तयार केली.



Source link

Leave A Reply

Your email address will not be published.