Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
भाजप नेत्या सुंदरराजन आणि तमिळनाडूचे भाजप प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांच्यातून विस्तवही जात नाही. सुंदरराज तेलंगणाच्या राज्यपालपदाचा राजीनामा देऊन दक्षिण चेन्नईतून लोकसभा निवडणूक लढल्या आणि पराभूत झाल्या. यानंतर त्यांनी अण्णामलाईंना जाहीरपणे लक्ष्य करण्यास सुरुवात केली. त्यामुळेच अमित शहांनी त्यांना भर कार्यक्रमात मंचावरच कडक शब्दांत सूचना दिल्याचं बोललं गेलं. या घटनेची बरीच चर्चाही झाली.
चेहऱ्यावर राग दिसत असलेले अमित शहा नेमकं काय बोलले याची माहिती आता सुंदरराजन यांनी दिली आहे. ‘लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच अमित शहांची भेट झाली. पराभवानंतरची परिस्थिती आणि आव्हानं यावर शहा माझ्याशी चर्चा करत होते. मी त्यांना सगळ्या गोष्टी सांगत होते. तेव्हा वेळ कमी असल्यानं त्यांनी मला राजकारणात, लोकसभा मतदारसंघात अधिक मेहनत करण्याचा सल्ला दिला,’ असं सुंदरराजन यांनी सांगितलं. पक्षात कोणतेही मतभेद नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
त्या व्हिडीओमध्ये नेमकं काय?
शपथविधी सोहळ्याला व्यासपीठावर भाजपचे नेते उपस्थित होते. व्यंकय्या नायडू, अमित शहा, जे. पी. नड्डा, नितीन गडकरी रांगेत बसले होते. तितक्यात सुंदरराजन व्यासपीठावर आल्या. नायडू, शहांना नमस्कार करत त्या पुढे गेल्या. तेव्हा शहांनी त्यांना बोलावलं. सुंदरराजन मागे आल्या. त्यानंतर शहा त्यांच्याशी बोलत होते. त्यांच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. यानंतर तमिळनाडू भाजपनं सारं काही आलबेल नसल्याची चर्चा होऊ लागली. सोशल मीडियावर अमित शहांचा व्हिडीओ बराच व्हायरल झाला.