Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Giorgia Meloni Net Worth: नमस्ते करून स्वागत करणाऱ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी; महिन्याचे उत्पन्न इतके लाख, एकूण संपत्ती…

8

रोम: इटली येथे जी-७ देशांची शिखर परिषद सुरू आहे. या परिषदेत इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी जगातील सर्व राष्ट्रप्रमुखांचे स्वागत नमस्ते अशा भारतीय पद्धतीने करत आहेत. मेलोनी यांच्या या स्वागताची चर्चा जगभरात होत आहे आणि त्याचे व्हिडिओ व्हायरल देखील होत आहेत. जॉर्जिया मेलोनी या इटलीतील प्रमुख नेत्या असून ५० पेक्षा कमी वय असताना त्यांनी देशाची सत्ता संभाळली आहे. युरोपमधील त्या सर्वात अनुभवी नेत्यांपैकी एक आहेत. २०२२ साली झालेल्या निवडणुकीत त्यांच्या ब्रदर्स ऑफ इटलीने प्रथमच विजय मिळवला होता. या निकालानंतर त्या देशाच्या पंतप्रधान झाल्या.

जॉर्जिया मेलोनी या इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत. कमी काळात त्यांनी मोठी लोकप्रियता मिळवली आहे. मेलोनी यांचा जन्म १५ जानेवारी १९७७ रोजी दक्षिण रोमच्या गारबेटला येथा झाला होता.मेलोनी लहान असताना त्यांचे आई-वडील विभक्त झाले. त्या लहान वयातच राजकारणात आल्या. २०१४ पासून ब्रदर्श ऑफ इटली या पक्षाचे नेतृत्व करत आहेत.
Tirumala Tirupati: तिरुपती मंदिर हिंदूंच्या हातात राहणार, तिरुमला येथे फक्त ‘जय गोविंदा’चा जयघोष; चंद्राबाबू नायडूंची मोठी घोषणा

मेलोनी या २००६ साली सर्व प्रथम लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर त्या नेहमीच संसदेत राहिल्या. पहिल्या दोन वर्षात त्यांनी चेंबरचे उपाध्यक्षपद संभाळले. २००८ ते २०११ या काळात त्या युवा मंत्री होत्या. इटलीमधील मीडिया आउटलेट मनीच्या रिपोर्टमध्ये मेलोनी यांच्या उत्पन्नाबद्दल सांगण्यात आले आहे. इटलीतील खासदाराला १०.४७ लाख इतके वेतन मिळते. यातील ३.३३ लाख रुपये हा दैनिक भत्ता असतो. या शिवाय टेलिफोन आणि प्रवासासाठी १.०७ लाख रुपये इतका निधी दिला जातो. मेलोनी या आपल्या वेतनाचा काही हिस्सा पक्ष निधीसाठी देतात. २०२२ मध्ये त्यांची संपत्ती २.६२ कोटी इतकी होती.

पंतप्रधान झाल्यापासून मेलोनी यांच्या संपत्तीची माहिती समोर आलेली नाही. पण २०२१ पासून त्यांच्या संपत्तीत वाढ होत आहे. २०२० करोनाच्या काळात त्यांचे उत्पन्न १.२ कोटी इतके होते. २००६ साली मेलोनी यांची संपत्ती १४.३१ कोटी इतकी होती.



Source link

Leave A Reply

Your email address will not be published.