Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Kuwait Fire: कोची विमानतळावर हुंदके अन् हंबरडे; कुवेतमधील आगीतील ४५ जणांचे मृतदेह भारतात

8

वृत्तसंस्था, कोची : कुवेतमधील भीषण आगीत मृत्युमुखी पडलेल्या ४५ भारतीयांचे मृतदेह हवाई दलाच्या विमानाने शुक्रवारी सकाळी केरळमधील कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणण्यात आले. विमानतळाच्या कार्गो टर्मिनलमधून एक-एक शवपेटी बाहेर येऊ लागली, तसे कुटुंबीयांनी तोपर्यंत दाबून धरलेले हुंदके फुटले. आपल्या जिवलगांना अखेरच्या क्षणी कोणत्या यातनांतून जावे लागले, या दु:खात बुडालेल्या कुटुंबीयांनी फोडलेल्या हंबरड्यांनी विमानतळावरील वातावरण शोकाकुल झाले.कुवेतमध्ये बुधवारी लागलेल्या भीषण आगीत मृत्युमुखी पडलेल्या ४९ जणांमध्ये ४५ भारतीयांचा समावेश असल्याचे समोर आले होते. या भारतीयांचे मृतदेह शुक्रवारी दाखल होणार असल्याने, त्यांचे कुटुंबीय पहाटेपासूनच कोची विमानतळावर दाखल होऊ लागले. हवाई दलाच्या सी-१३० जे विमानाने ४५ जणांचे मृतदेह शुक्रवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास विमानतळावर दाखल झाले. कस्टम्स, इमिग्रेशन, आरोग्य कार्यालय तपासणी आदी आवश्यक सुरक्षाविषयक प्रक्रिया पूर्ण करून ११.३० वाजण्याच्या सुमारास एक-एक मृतदेह कार्गो टर्मिनलमधून बाहेर आणून ठेवण्यास प्रारंभ झाला. शवपेट्यांवर आपल्या प्रियजनांची नावे वाचताच कुटुंबीयांनी केलेला आक्रोश उपस्थितांचे हृदय पिळवटून टाकणारा ठरला. त्यांचे सांत्वन करणे उपस्थित मंत्र्यांनाही अशक्य झाले.

केरळमधील २३, तमिळनाडूमधील सात आणि कर्नाटकातील एक अशा ३१ श्रमिकांचे मृतदेह कोची विमानतळावर प्रशासनाने स्वीकारले. केरळ पोलिसांनी या मृतांना मानवंदना दिली. औपचारिक कार्यक्रमानंतर हे मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. रुग्णवाहिकांतून मूळ गावी मृतदेह नेले जात असताना केरळ पोलिसही त्यांच्यासोबत होता. तमिळनाडूमधील श्रमिकांच्या मृतदेहांच्या रुग्णवाहिकांसोबत राज्याच्या सीमेपर्यंत केरळ पोलिसांनी सोबत केली. उर्वरित १४ मृतदेह देशांतर्गत विमानाने दिल्लीला रवाना करण्यात आले.

परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह या विमानाबरोबर दाखल झाले. केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन, केंद्रीय मंत्री सुरेश गोपी, राज्यातील मंत्री के. राजन, पी. राजीव, वीणा जॉर्ज, कडनपल्ली रामचंद्रन, रोशी ऑगस्टीन, विरोधी पक्ष नेते व्ही. डी. सतीशन यांच्यासह अनेक खासदार व आमदार यांनी यावेळी विमानतळावर उपस्थित राहून मृतांना आदरांजली वाहिली.
Indian Students Drown : नदीत बुडालेल्या तीन लेकराची पार्थिवं १० दिवसांनी जळगावात, अंत्ययात्रेला गाव लोटलं, अश्रूंचा महापूर
दुहेरी आघात

चेंगन्नूर येथील कुंटुंबासाठी ही आग म्हणजे दुहेरी आघात ठरला. कुवेतमधील कंपनीत अकाउंटंट म्हणून काम करत असलेला शिबू वर्गीस (३०) आणि त्याचे काका मॅथ्यू थॉमस (५३) या दोघांचे या आगीत निधन झाले. शिबू याच्या पश्चात पत्नी आणि लहान मुलगा आहे.

मंत्र्यांना परवानगी नाकारल्याने वाद

तिरुनंतपुरम : कुवेत आगीनंतर मदत कार्यात समन्वय साधण्यासाठी कुवेतला जाण्यास केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांना केंद्र सरकारने परवानगी नाकारल्याचे शुक्रवारी तीव्र पडसाद उमटले. केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन; तसेच राज्यातील विरोधी पक्ष काँग्रेसने यावरून केंद्र सरकारवर टीका केली.

आणखी एका भारतीयाचा मृत्यू

कुवेत सिटी : कुवेतमधील भीषण आगीत होरपळलेल्या आणखी एका भारतीयाचा उपचारांदरम्यान शुक्रवारी मृत्यू झाला. त्यामुळे या दुर्घटनेत जीव गमावलेल्या भारतीयांची संख्या ४६ वर गेली. या आगीत ५० जण मृत्युमुखी पडले असून, बहुतेकांचा मृत्यू धुरामुळे श्वास कोंडल्याने झाला.



Source link

Leave A Reply

Your email address will not be published.