Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कार्तिक आर्यनच्या ‘चंदू चॅम्पियन’ची दमदार सुरूवात,पण थिएटरमध्ये कोकणी ‘मुंज्या’चाच बोलबाला

13

मुंबई-कार्तिक आर्यनचा ‘चंदू चॅम्पियन’ हा चित्रपट काल १४ जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाची कथा पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर यांवर आधारित असून कार्तिक आर्यननेच त्यांची भूमिका साकारली आहे. कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी केली आहे. या चित्रपटातील अभिनयासाठी तसेच इतर अंग मेहनतीसाठी कार्तिक आर्यनचे खूप कौतुक होत आहे. थिएटरमध्ये सिनेमाची चांगली ओपनिंगही झाली आहे. शिवाय अभय वर्मा, मोना सिंह आणि शर्वरी वाघ यांच्या ‘मुंज्या’ चित्रपटाने ८ व्या दिवशीही आपले यश समान राखले आहे.

अंड्याचं नाही आनंदरावांच ऑमलेट! श्रीरंग गोडबोलेंची वेटरकडे अतरंगी ऑर्डर, राज ठाकरेंनी सांगितलेला किस्सा
रिपोर्ट्सनुसार, ‘चंदू चॅम्पियन’ जवळपास १०० ते १४० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनल्याचे म्हटले जाते. त्यामुळे सुपरहिट होण्यासाठी २०० ते २५० कोटी रुपयांचे लक्ष्य सिनेमापुढे आहे. पहिल्या दिवशी हा सिनेमा साधारण १० कोटींपर्यंतची दमदार ओपनिंग करेल असे भाकित वर्तवले जात होते.

‘चंदू चॅम्पियन’ची पहिल्या दिवशीची कमाई


sacnilk च्या रिपोर्टनुसार, हा चित्रपट पहिल्या दिवशी केवळ ४.७५ कोटींची कमाई करू शकला. हा एक प्राथमिक अहवाल आहे, ज्यामध्ये ही आकडे आणखी बदलू शकतात. या चित्रपटाचे जगभरातील कलेक्शन किती आहे हे अद्याप समोर आलेले नाही. एकूणच चित्रपटाने अपेक्षेपेक्षा कमी कलेक्शन केल्याचे निर्शनास येत आहे. मात्र, या चित्रपटाचे समीक्षकांकडून भरभरून कौतुक झाल्याने कदाचित या वीकेंडला चित्रपट चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.

मर्डर प्रकरणात साऊथ अभिनेता दर्शन बाबत मोठी अपडेट, ड्रायव्हरने पोलिसांसमोर केलं सरेंडर
मुंज्याची जोरदार कमाई

अभय वर्मा, मोना सिंह आणि शर्वरी वाघ यांच्या ‘मुंज्या’ या हॉरर-कॉमेडी ड्रामा चित्रपटाने थिएटरमध्ये धुमाकूळ घातला आहे. कोकणातील भूतांच्या कथा जगप्रसिद्ध आहेत. अशाच एका भूतावर आधारित हा सिनेमा असल्याने प्रेक्षकांची मनं जिंकण्यात तो यशस्वी झाला आहे. कोकणात राहणाऱ्या प्रत्येक माणसाकडून मुंज्या, हडळ, देवचार यांच्या अनेक कथा ऐकायला मिळतात. आजही लोक गावी गेल्यावर या भूंताच्या कथा ऐकल्या जातात.

‘मुंज्याचीही सुरुवात ४ कोटींपासून’

या सिनेमाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर ‘मुंज्या’ची सुरुवातच ४ कोटी रुपयांपासून झाली होती. यानंतर, पहिल्या वीकेंडमध्ये सिनेमाने मोठी झेप घेत ४ कोटींहून अधिकचा गल्ला जमवला. गेल्या दोन दिवसांत हे आकडे निश्चितपणे कमी झाले असले तरी मागील अनेक चित्रपटांच्या रेकॉर्डपेक्षा ते चांगले आहे.

‘मुंज्या’ चित्रपटगृहात कमाल करत आहे

या चित्रपटाने आठव्या दिवशीही उत्कृष्ट कलेक्शन केले आहे. शुक्रवारी याने ३.३५ कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे रिलीज झाल्यापासून या सिनेमाने एकूण ३८.६५ कोटी रुपये देशभरात कलेक्शन केले आहे. तर जगभरात या चित्रपटाने ४७ कोटींचा आकडा पार केला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने ४.२१ कोटी कमावलेले, तर दुसऱ्या दिवशी ७.४० कोटी, तिसऱ्या दिवशी तब्बल ८.४३ कोटींची कमाई या सिनेमाने केली. त्यानंतर सोमवारी चौथ्या दिवशी ४.११ कोटी कमावले तर मंगळवारी पाचव्या दिवशी ४.२१ कोटी, मग सहाव्या दिवशी ४.११ कोटी तर काल ४.३ कोटी अशी क्रमशा कमाई सिनेमाची झाली आहे.



Source link

Leave A Reply

Your email address will not be published.