Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Shocking! NEET टॉपर 12 वीत भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रात नापास ? व्हायरल मार्कशीटने प्रश्न झालेत उपस्थित

11

नवी दिल्ली : ऑनलाइन मार्कशीट समोर आल्यानंतर NEET UG 2024 टॉपरच्या स्कोअरबद्दल प्रश्न उद्भवले आहेत. मार्कशीटने विद्यार्थ्याच्या इयत्ता 12 आणि एनईईटी यूजी स्कोअरमध्ये खूप तफावत दिसत आहे. ज्यामुळे NEET निकालांच्या सत्यतेबद्दल शंका निर्माण झाली.सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या मार्कशीटमध्ये विद्यार्थीनीला NEET UG मध्ये 720 पैकी 705 गुण मिळवले आहेत. तथापि, इयत्ता 12वीत, विद्यार्थीनी भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रात नापास झाल्याची माहिती दिली.

भौतिक आणि रसायनमध्ये नापास

मार्कशीटमध्ये दिसत आहे की, विद्यार्थिनी भौतिकशास्त्राच्या थेअरीमध्ये 100 पैकी 21 आणि भौतिकशास्त्राच्या प्रॅक्टिकलमध्ये 50 पैकी 36 गुण मिळवले आहेत. रसायनशास्त्राच्या थेअरीमध्ये, विद्यार्थिनी ला 100 पैकी 31 आणि प्रॅक्टिकलमध्ये 50 पैकी 33 गुण मिळाले. तरीही, विद्यार्थिनीेने NEET UG रसायनशास्त्रात 99.861 टक्के आणि भौतिकशास्त्रात 99.8903 पर्सेंटाइल मिळवले.या गुणांमधील फरकाने NEET निकालाच्या वैधतेबद्दल गंभीर प्रश्न निर्माण केले जात आहेत. “महाराष्ट्र टाइम्स मार्कशीट इमेजची सत्यता पडताळू शकत नाही.

23 जून रोजी NEET UG पुनर्परीक्षा

“हे प्रकरण समोर येत असताना, NTA ने 1,563 NEET UG उमेदवारांसाठी 23 जून रोजी पुनर्परीक्षा आयोजित केली आहे. या उमेदवारांना सुरुवातीला चुकीच्या प्रश्नपत्रिका, फाटलेल्या OMR शीट्स किंवा OMR शीट वितरणात विलंब यासारख्या समस्यांमुळे ग्रेस गुण मिळाले. नवीन निकाल 30 जूनला अपेक्षित आहेत.सर्वोच्च न्यायालयाने एनटीएच्या उच्चाधिकार समितीच्या अहवालाचे पुनरावलोकन केल्यानंतर हा निर्णय आला. सुमारे 24 लाख वैद्यकीय इच्छुकांनी NEET-UG 2024 ही स्पर्धात्मक प्रवेश परीक्षा दिली, जी NTA द्वारे 5 मे रोजी आयोजित केली गेली होती. मूलतः 14 जून रोजी नियोजित होते, लवकर उत्तरपत्रिका मूल्यमापनानंतर 4 जून रोजी निकाल जाहीर करण्यात आला.

New Delhi, Jun 12 (ANI): NEET aspirants protest against the alleged irregulariti...

New Delhi, Jun 12 (ANI): NEET aspirants protest against the alleged irregularities in the NEET-UG examination at Jantar Mantar, in New Delhi on Wednesday. (ANI Photo/Ritik Jain)

NEET परीक्षेच्या निकालात घोळ झाल्यामुळे देशभरात त्याचे पडसाद पडत आहेत. केंद्र सरकार विरोधात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी देशाच्या विविध भागात आंदोलन करीत आहे. अशाच ही बातमी आल्याने आणखी संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.