Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Suspicious Death: छतावरुन पडली, ३६ पेक्षा अधिक जखमा, बरगड्या तुटून फुफ्फुसात; डॉक्टर दीक्षाचा मृत्यू घातपात?
पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, दीक्षाच्या शरीरावर ३६ हून अधिक जखमा झाल्या होत्या, डोक्याचे हाडही तुटले, बरगड्या देखील तुटल्या तर फुफ्फुस देखील फुटले होते. परिणामी तिला जास्त रक्तस्त्राव झाला. जे दीक्षाच्या मृत्यूचे मूळ कारण ठरल्याचे नमूद करण्यात आले आहे. यासोबतच तिच्या सहकारी डॉक्टरांवर देखील सध्या संशय कायम आहे.
या संशयास्पद मृत्यूबाबत पोलिसांनी सा्ंगितले की, महिला डॉक्टरचा खाली पडून मृत्यू झाल्याची शक्यता अधिक आहे. कॅम्पसमध्ये बसवलेले सीसीटीव्हीही तपासले आहेत, ज्यामध्ये महिला डॉक्टर आणि इतर दोन मित्र इमारतीच्या छतावर फिरत असल्याचे दिसत होते. तेथून बाहेर पडताना कोणत्याही प्रकारचा दबाव त्यात दिसला नाही. यासोबतच फॉरेन्सिक टीमने सांगितले की, स्लॅब कमकुवत होता त्यामुळे तो तुटला आणि दीक्षा खाली पडली.
पोलिसांनी यात संशयित दोन्ही सहकारी डॉक्टरांची देखील दिवसभर चौकशी केली. तर सद्यस्थितीत मिळालेली माहिती आणि पुराव्यांच्या आधारे ही घटना अपघात असल्याचे मानले आहे.
बरेली येथील दीक्षा तिवारी या विद्यार्थिनीने कानपूर मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले होते आणि तिला मेरठमध्ये पोस्टिंग मिळाले होते. हा आनंदाचा क्षण साजरा करण्यासाठी ती आणि तिचे दोन मित्र हिमांशू आणि मयंक रात्री रेस्टॉरंटमध्ये पार्टी करायला गेले होते. तेथून परतल्यावर तिघंही मेडिकल कॉलेजच्या ऑडिटोरियम इमारतीच्या छतावर गेले. बोलता बोलता दीक्षा छतावर बनवलेल्या एका डक्टवर (व्हेंटिलेटरसाठी बनवलेली जागा) बसली. दीक्षा बसून बोलत असलेल्या छताचा भाग अचानक तुटला आणि दीक्षा सहाव्या मजल्यावरुन खाली पडली ज्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.