Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
दुसरीकडे, ‘मुंज्या’ बॉक्स ऑफिसवर अजूनही वर्चस्व गाजवत आहे. गेल्या ९ दिवसांत त्याने बॉक्स ऑफिसवर घसघशीत कमाई केली. ‘मुंज्या’मध्ये कोणताही मोठा स्टार नाही, उत्कृष्ठ कथा व आशयाच्या जोरावर तो प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करण्यात यशस्वी ठरला आहे. विशेष म्हणजे ‘चंदू चॅम्पियन’ने दुस-या दिवशी जेवढी रक्कम जमा केली होती तेवढीच रक्कम ‘मुंज्या’ने ९ व्या दिवशी कमावली आहे. चला जाणून घेऊया दोन्ही चित्रपटांनी किती कलेक्शन केले.
सर्वप्रथम चंदू चॅम्पियनबद्दल पाहू. १००-१४० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान यांनी केले आहे. या चित्रपटाकडून जबरदस्त ओपनिंगची अपेक्षा होती, पण ती सपशेल फेल ठरली. मात्र, दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. गेल्या काही काळापासून बॉक्स ऑफिस सुखेसडसडीत पडले आहे. ‘बडे मियाँ छोटे मियाँ’, ‘मैदान’ सारखे मोठे स्टारकास्ट असलेले बिग बजेट चित्रपट फ्लॉप झाले. फक्त राजकुमार रावचा ‘श्रीकांत’ काही प्रमाणात प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरला. आता ‘चंदू चॅम्पियन’ची कामगिरीही निराशाजनक आहे.
‘चंदू चॅम्पियन’ची दुसऱ्या दिवशीची कमाई
‘चंदू चॅम्पियन’ने पहिल्या दिवशी ४.७५ कोटी रुपयांची ओपनिंग केली होती. Sacnilk च्या अहवालानुसार, कार्तिक आर्यन स्टारर चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ६.७५ कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे दोन दिवसांत सिनेमाचे एकूण कलेक्शन ११.५० कोटी रुपये झाले आहे.
‘मुंज्या’ने ९ व्या दिवशी धमाका केला
‘मुंज्या’ बद्दल बोलायचे झाले तर, त्याने ८ व्या दिवशी ३.५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता, तर ९ व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या शनिवारी कमाईत आणखी वाढ झाली. ‘मुंज्या’ने दुसऱ्या शनिवारी म्हणजेच ९ व्या दिवशी ६.२५ कोटी रुपयांची दुप्पट कमाई करून सर्वांना आश्चर्यचकित केले. चित्रपटाचे एकूण कलेक्शन ४५.२३ कोटी रुपये आहे. हा सिनेमा ३० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला. त्यानुसार हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट झाला आहे.
‘मुंज्या’चे कौतुक
‘मुंज्या’ हा हॉरर कॉमेडी असून यात अभय वर्मा, मोना सिंग आणि शर्वरी वाघ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे खूप कौतुक होत असल्याचे पाहायला मिळते. हा सिनेमा कोकणातील भूतांच्या गोष्टीवर आधारित आहे.