Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Aliens: आपल्या आसपासच आहेत एलियन्स, लपून राहतात? धडकी भरवणारं रहस्य उघड

7

मुंबई: एलियन्सबाबत नेहमीच नवनवीन माहिती समोर येत असते. पण, आता एलियन्सबाबत धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. जर तुम्हाला कधी कळालं की तुमच्या आसपास एलियन्स राहत आहेत तर काय होईल? हार्वर्ड विद्यापीठाने नुकताच या संदर्भात एक अहवाल सादर केला आहे. ही ‘क्रिप्टोटेरेस्ट्रियल’ प्राण्यांशी संबंधित अशी एक हायपोथेसिस आहे, ज्याच्या अंतर्गत एलियन्स गुप्तपणे माणसांसोबत राहतात किंवा ते चंद्रावर राहू शकतात.

गेल्या सप्टेंबरमध्ये, शेकडो यूएफओ दिसल्याच्या नासाच्या तपासणीत असे आढळून आले की अशा घटनांमागे एलियनचा हात असल्याचा कोणताही पुरावा नाही. मात्र, बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, यूएस स्पेस एजन्सीने ही शक्यता नाकारलेली नाही. NASA प्रशासक बिल नेल्सन म्हणाले की, जगातील सर्वात मोठी अंतराळ एजन्सी केवळ संभाव्य युपीए घटनांच्या संशोधनात फक्त पुढाकार घेणार नाही, तर अधिक पारदर्शक डेटा देखील शेअर करेल.

हावर्ड विद्यापीठाच्या ह्युमन फ्लोरिशिंग प्रोग्रामच्या या अभ्यासाने अनेक तत्त्वांवर प्रकाश टाकला आहे. यामध्ये प्राचीन मानवी संस्कृती, गैरमानवी प्रजाती ज्या खूप प्रगत आहेत आणि अगदी रहस्यमय गोष्टी जसे की परी आणि एल्व्ह्स (काल्पनिक) यांच्या अस्तित्वाचाही उल्लेख करण्यात आला आहे.

डॉ. एमिली रॉबर्ट्स यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन पथक कार्यरत होते. त्यात ऐतिहासिक तथ्ये आणि लोककथा यांचे विश्लेषण केले गेले. क्रिप्टोटेरेस्ट्रियल अंदाजानुसार तर्कशुद्धतेची चाचणी करणे आणि अज्ञात एरियल फिनॉमिना (UAP) सारख्या आधुनिक घटनांशी त्यांचा संबंध शोधण्याचा प्रयत्न करणे हा याचा उद्देश होता.

सायंटिफिक रिपोर्ट्स या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात असामान्य सांगाड्यांचे अवशेषांचा शोध, कथित भूगर्भातील सभ्यता आणि संपूर्ण इतिहासातील इतर जगाच्या प्राण्यांशी झालेल्या चकमकींचा आढावा घेण्यात आला. उदाहरणार्थ, चिलीमधील अटाकामा सांगाडा हा प्राथमिक अलौकिक असल्याचा अंदाज लावला जात होता, परंतु नंतर तो अनुवांशिक उत्परिवर्तनांसह मानवी गर्भ म्हणून ओळखला गेला.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.