Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
डिझाईन आणि बिल्ड क्वॉलिटी
Oppo F27 Pro+ 5G स्मार्टफोन डस्क पिंक आणि मिड नाइट नेव्ही कलर ऑप्शन मध्ये येतो. ही डिजाइन आकर्षक वाटते, फोनच्या मागे व्हिगन लेदर बॅक पॅनल तर फ्रंटला कर्व्ह एज डिस्प्ले देण्यात आला आहे. याची जाडी फक्त 7.58mm असून वजन 177 ग्राम आहे.
परंतु F27 Pro+ फोनची सर्वात मोठी खासियत म्हणजे याची ड्यूरेबलीटी. हा फोन IP68 सर्टिफाइड आहे त्यामुळे धूळ आणि 1.5 मीटर पाण्यात 30 मिनिटे राहू शकतो. तर यातील IP66 आणि IP69 सर्टिफिकेशन्स कोणत्याही बाजूने येणार्या हाय प्रेशर, हाय टेंपरेचर वॉटर जेट पासून देखील मोबाइल सुरक्षित ठेवतात. हा खर्या अर्थाने मान्सून रेडी फोन आहे. फोनचा डिस्प्ले Gorilla Glass 2 च्या प्रोटेक्शनसह येतो आणि ओल्या हाताने देखील वापरता येतो.
F27 Pro+ ला स्विस SGS प्रीमियम परफॉर्मन्स 5 स्टार ड्रॉप रेझिस्टन्स सर्टीफिकेट मिळाले आहे त्यामुळे 1.8 मीटर उंचीवरून पडून देखील या फोनला काही होत नाही. तसेच फोन MIL-STD 810H मिलट्री ग्रेड शॉक रेझिस्टन्स टेस्ट मध्ये पास झाला आहे. यावरून याची मजबूती दिसून येते.
फोनच्या बॉक्स मध्ये 80W चा चार्जर, यूएसबी सी चार्जिंग केबल, सिम टूल, क्विक गाईड, सेफ्टी गाईड आणि प्रोटेक्टिव केस मिळते.
डिस्प्ले
F27 Pro+ मधील 6.7 इंचाचा अॅमोलेड पॅनल वायब्रंट आणि शार्प आहे त्यामुळे तुमचे आवडीचे शो बिंज वॉच करण्यासाठी परफेक्ट स्क्रीन आहे समजा. ही स्क्रीन 120Hz रिफ्रेश रेट आणि 950 nits ब्राईटनेसला सपोर्ट करते त्यामुळे उन्हात देखील स्क्रीन चांगली दिसते. डुअल स्पिकर नसल्यामुळे स्टीरियो साऊंड मिळत नाही पण बॉटम स्पिकर मध्ये अल्ट्रा मोड आहे ज्यामुळे 300% जास्त आवाज वाढतो.
परफॉर्मन्स
परफॉर्मन्स साठी F27 Pro+ मध्ये Dimensity 7050 चिपसेट, LPDDR4x RAM, आणि UFS 3.1 स्टोरेज देण्यात आली आहे. अॅप्स चटकन ओपन होतात, मल्टीटास्किंग बिनदिक्कत करता येते आणि कॅज्युअल गेमिंग करताना काही प्रॉब्लम येत नाही. ColorOS 14.1 ची लेयर असलेला Android 14 एक स्मूद अनुभव देतो. परंतु यातील प्री इंस्टाल्ड अॅप्स सर्वांना आवडणार नाहीत. कंपनी 2 Android OS अपडेट देणार आहे तर 3 वर्ष सिक्युरिटी अपडेट मिळतील. स्टोरेज वाढविण्यासाठी मात्र कोणताही SD कार्ड स्लॉट नाही.
यातील 5,000mAh बॅटरी नॉर्मल यूजवर सहज एक दिवस टिकू शकते आणि 67W फास्ट चार्जिंग पुरेसा स्पिड देते. हा फोन फक्त 44 मिनीटांत 0 टू 100% चार्ज होऊ शकतो, असा दावा कंपनीने केला आहे.
कॅमेरा
Oppo F27 Pro+ मध्ये फ्लॅगशिप ग्रेड 64 मेगापिक्सलचा OmniVision OV64B मेन सेन्सर, जो वायब्रंट कलर्ससह डिटेल फोटो कॅप्चर करतो आणि पोर्ट्रेट मोडचे रिजल्ट पण इम्प्रेस करतात. परंतु मेन कॅमेर्यात OIS नाही. पोर्ट्रेट रिटचींग आणि AI इरेजर सारखे AI फीचर खूप फायदेशीर ठरतात. त्यामुळे फोटो मधील अनावश्यक व्यक्ति आणि वस्तू काढून टाकता आल्या. यात 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर मिळतो. फ्रंटला असलेला 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा पण चांगले फोटो पण यात सुधारणा करता आली असती.
Oppo F27 Pro+ 5G ची किंमत
Oppo F27 Pro+ 5G चे दोन वेरिएंट भारतात आले आहेत.
8GB+128GB: 27,999 रुपये
8GB+256GB: 29,999 रुपये
सध्या हा फोन Amazon, Flipkart आणि Oppo India च्या वेबसाईटवर प्री ऑर्डरसाठी उपलब्ध झाला आहे. याचा पहिला सेल 20 जूनला आहे. यावर अनेक बँक ऑफर आहेत त्यामुळे किंमत आणखी कमी होईल.