Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

BJP Leader Death In Protest : कर्नाटकातील भाजप नेत्याचा पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधातील आंदोलनादरम्यान मृत्यू

10

शिवमोग्गा : कर्नाटकातील वाढलेल्या पेट्रोल-डिझेल दराचा निषेध करण्यासाठी गेलेल्या एका जेष्ठ भाजप नेत्याचा आंदोलनादरम्यान मृत्यू झाला आहे. सोमवारी पेट्रोल-डिझेल दरातील वाढीविरोधात पक्षाच्या वतीने आयोजित एका आंदोलनादरम्यान ही दुख:द घटना घडली.

कर्नाटकातील काँग्रेस सरकारने शनिवारी केलेल्या इंधन दरवाढीविरोधात भाजप आक्रमक झाली आहे. याविरोधात सोमवारपासून भाजपने राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. याच दरम्यान कर्नाटकातील शिवमोग्गा येथील आंदोलनात कर्नाटक भाजपचे जेष्ठ नेते,माजी विधानपरिषद सदस्य ६९ वर्षीय एम.बी. भानुप्रकाश हे सहभागी झाले होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते या आंदोलनाचे नेतृत्व करत होते. यादरम्यान त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केले. आंदोलनस्थळावरुन परतत असतेवेळी गाडीत चढताना त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने नजीकच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतू डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
Rahul Gandhi Resignation : ..तर राहुल गांधींची दोन्ही जागांवरील निवड होईल रद्द,निर्णय घेण्यासाठी उरले फक्त २४ तास
झालेल्या घटनेबाबत कर्नाटक भाजप प्रमुख बी.वाय विजयेंद्र यांनी शोक व्यक्त केला. भानुप्रसाद यांनी पक्षासाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम केले. त्यांचे जाणे ही पक्षाची खूप मोठी हानी असल्याचे त्यांनी नमुद केले. भानुप्रसाद यांनी पक्षाच्या वेगवेगळ्या पदांवर काम केले होते. ते माजी विधानपरिषद सदस्य होते. तसेच त्यांनी यापूर्वी भाजप राज्य उपाध्यक्ष पद तसेच जिल्हाध्यक्षपद भूषविले होते. शिवमोग्गा तालुक्यातील मत्तुर या त्यांच्या गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

कर्नाटक मुख्यमंत्र्यांची महाराष्ट्रातील इंधन दरांशी तुलना

कर्नाटक सरकारने पेट्रोलच्या करामध्ये(Value Added Tax) २९.८४ टक्के वाढ केली आहे. तर डिझेल वरील करात १८.४४ टक्के वाढ करण्यात आली आहे. कर्नाटचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या वाढीला इतर राज्यांतील वाढीच्या तुलनेत कमी असल्याचे सांगत भाजपला उत्तर दिले आहे. यावेळी भाजपशासित महाराष्ट्राचे उदाहरण देत ते म्हणाले की, “कर्नाटक सरकारने पेट्रोल वरील VAT (Value Added Tax) मध्ये २९.८४ टक्के तर डिझेल मध्ये १८.४४ टक्के इतकी वाढ केली आहे. या वाढीनंतरही राज्याचा इंधनावरील कर हा दक्षिणेतील इतर बहुतांश राज्यांच्या व महाराष्ट्रासारखी समान अर्थव्यवस्था असणाऱ्या राज्याच्या करांपेक्षा कमी आहे. महाराष्ट्रात पेट्रोलवर २५ टक्के VAT अधिक ५.१२ रुपये अतिरिक्त कर आकारला जातो तर डिझेलवर तो २१ टक्क्यांपर्यंत आहे. कर्नाटकातील नवे दर हे या तुलनेत आजही परवडणारे आहेत.”

याबाबत कर्नाटकातील विरोधी पक्षातील भाजपने सरकारच्या या निर्णयाचा विरोध करत राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.