Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

CM योगींना हटवण्याची तयारी ‘तेव्हाच’ झालेली! पुस्तकातील दाव्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ

8

लखनऊ: लोकसभा निवडणुकीच्या निकालानं सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला धक्का बसला. मागील दोन निवडणुकांमध्ये बहुमताचा आकडा ओलांडणाऱ्या भाजपला यंदा मात्र ३२ जागा कमी पडल्या. त्यामुळे एनडीएतील घटक पक्षांच्या साथीनं त्यांना सत्ता स्थापन करावी लागली. उत्तर प्रदेशात भाजपला मोठा धक्का बसला. गेल्या निवडणुकीत ६१ जागा जिंकणाऱ्या भाजपला यंदा ३३ जागा मिळाल्या. सर्वाधिक ३७ जागा जिंकून समाजवादी पक्षानं बाजी मारली.

उत्तर प्रदेशात भाजपची कामगिरी खालावल्यानं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल उलटसुलट चर्चा सुरु झाल्या. आदित्यनाथ यांना मुख्यमंत्रिपदावरुन दूर करण्यात येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. या सगळ्या चर्चा सुरु असताना एका पुस्तकातील दाव्यामुळे खडबळ उडाली आहे. २०२२ मध्ये उत्तर प्रदेशात विधानसभेची निवडणूक झाली. त्या निवडणुकीआधी आदित्यनाथ यांना हटवण्याची पूर्ण योजना आखण्यात आलेली होती, असा दावा इंडियन एक्प्रेसचे पत्रकार श्यामलाल यादव यांनी त्यांच्या ‘ऍट द हार्ट ऑफ पॉवर: द चीफ मिनिस्टर्ट ऑफ उत्तर प्रदेश’ पुस्तकात केला आहे.
काँग्रेसमध्ये मोठे बदल होणार; १३ जागा आणणारे पटोले राहणार की जाणार? गैरहजेरीमुळे ‘नाना’ चर्चा
‘योगी आदित्यनाथांना मुख्यमंत्रिपदावरुन दूर सारायचं ठरलेलं होतं. पण योगींना हटवल्यास भाजपला नुकसान होईल याची जाणीव पक्षाला झाली,’ असा उल्लेख पुस्तकात आहे. योगींना का हटवण्यात येणार होतं, त्यामागे कारण काय होतं, याचा तपशील पुस्तकात नाही. पण त्यावेळी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्यासोबत त्यांचे मतभेद वाढत होते याकडे लक्ष वेधण्यात आलं आहे.

२०१७ मध्ये भाजपनं उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत ३१२ जागा जिंकल्या. भाजपच्या तब्बल २६५ जागा वाढल्या. सत्ताधारी समाजवादी पक्षाच्या १७७ जागा घटल्या. योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. २०२२ मध्ये भाजपच्या ५७ जागा कमी झाल्या. भाजपला २५५ जागा मिळाल्या. भाजपचं सरकार कायम राहिलं आणि योगी पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले. सपाच्या ६४ जागा वाढून त्या १११ वर पोहोचल्या. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला ३३ जागा मिळाल्या. २०१९ मध्ये त्यांनी ६१ जागा खिशात घातल्या होत्या.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.