Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीममध्ये सापडली गोम; ४०% टक्के बाजारपेठ ताब्यात असलेला ब्रँड गोत्यात

6

Noida Woman Find Centipede in Ice-cream : मुंबईतील धक्कादायक प्रकरणानंतर नोएडातही आइस्क्रीमध्ये आढळले भलतेच काही. दिपा देवी या नोएडास्थिती गृहिणीने आपल्या मुलाला मॅगो मिल्क शेक बनवुन देण्यासाठी ऑनलाईन वेबसाईट वरुन आइस्क्रीम मागवले पण मॅगो मिल्कशेक बनवण्याआधीच आइस्क्रीम मध्ये अनपेक्षित पाहुणा पाहून महिलेची भंबेरी उडाली.प्रतिष्ठित बॅन्ड्रची व्हॅनिला फ्लेवर आइस्क्रीममध्ये गोम आढळून आल्याने सारेच चक्रावले आहेत. महिलेने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत आइस्क्रीम कंपनीसह अन्य एजन्सीवर तक्रार दाखल केली आहे.

उत्तरप्रदेशातील नोएडा सेक्टर १२ मध्ये हा प्रकार घडलाय. आइस्क्रीम पाहून महिलेने तातडीने आइस्क्रीम व्हिडिओची तक्रार दाखल केली आहे. ऑनलाइन ऑर्डर केलेल्या पोर्टलने महिलेला पैसे रिफंड केले आहेत. ऑर्डर हाती येताच महिलेने आइस्क्रीमच्या डब्ब्याचे झाकण उत्साहाने उघडले पण, तिला गोम आइस्क्रीम मध्ये दिसली आणि महिलेने किळसवाणा प्रकार सोशल मीडीयावरुन उघडकीस आणला.
आइस्क्रीमचाचणी उन्हाळ्यातच; मालाडमधील घटनेनंतर अन्न व औषध प्रशासनाची कबुली

नोएडा फूड इंस्पेक्टर अक्षय गोयल म्हणाले, ” साधारण १५ जूनला ही घटना घडली आहे. यामध्ये प्रतिष्ठित आइस्क्रीम उत्पादकांचे नाव समोर आले आहे. प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार गोम आइस्क्रीम मध्ये आढळली आहे. घटनेची दखल घेत अन्न आणि खाद्य विभागाने उत्पादक आणि वितरकाविरोधात तक्रार दाखल करुन घेतली आहे.तसेच आइस्क्रीमचा काही नमुना सुद्धा तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. तसेच संबंधितांवर लवकर कारवाई करु अशी ग्वाही गोयल यांनी दिली आहे.

याआधी मुंबईतसुद्धा अशीच एक घटना घडली. ऑनलाइन ऑर्डर केलेल्या आइस्क्रीममध्ये चक्क बोट सापडल्याची घटना घडली. या घटनेची बातमी देशभरात वाऱ्यासारखी पसरली. लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आता अशाच दुसऱ्या घटनेमुळे आइस्क्रीम चाहत्यांमध्ये संताप पाहायला मिळतोय.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.