Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

हत्या करुन मगर शिजवली, अख्ख्या गावाला मेजवानी; सगळ्यांनी ताव मारला अन् सुटकेचा निश्वास सोडला

7

भल्या मोठ्या मगरीने ऑस्ट्रेलियामधील एका गावात दहशत पसरवली होती. गावकरी या खाऱ्या पाण्याच्या मगरीपासून त्रस्त झाले होते. अखेर त्या मगरीची हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर चक्क मारलेल्या मगरीला शिजवून अख्ख्या गावाने मेजवानी चाखली आहे.

वर्षाच्या सुरुवातीला आलेल्या पुरानंतर ३.६३ मीटरची मगर उत्तर ऑस्ट्रेलियामधील बेनेस नदीत आली होती, निवासी वस्तीपासून २५० मीटरवर असलेल्या या मगरीने येथील समुदायाचे अनेक कुत्रेही फस्त केल्याची बातमी समजते.

आदिवासी समाजातील वडिलधाऱ्यांशी आणि तेथील पारंपारिक जमीन मालकांशी याविषयी विचारले असता त्यांनी सांगितले की, पोलिसांनी मंगळवारी या भल्या मोठ्या मगरीला गोळ्या घालून ठार केले.
Apple: बायकोनं ‘ते’ मेसेज पाहिले, घटस्फोट दिला; आता नवऱ्यानं अ‍ॅपलवर ठोकला ५३ कोटींचा दावा, प्रकरण काय?
‘पारंपारिक जमीनमालक, वडीलधारी व्यक्ती, समुदायातील सदस्य आणि तसेच पार्क्स आणि वाईल्डलाईफ यांच्याशी या गंभीर विषयाबाबतीत सल्लामसलत करण्यात आली. परिणामी मगरीने समुदायासाठी जीवघेणा धोका निर्माण करू नये यासाठी आम्ही तिला गोळी मारुन ठार केले.’ ऑस्ट्रेलिया उत्तरेतील पोलिसांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे. एकदा मगर मेल्यानंतर, तिला जवळच्या आदिवासी समुदायात नेण्यात आले. जेथे पारंपारिक पद्धतीने मगरीला शिजवून अख्ख्या गावाला जेवण घालण्यात आले.

माध्यमांशी संवाद साधताना पोलिस सर्जंट अँड्र्यू मॅकब्राइड म्हणाले, ‘मगरीची शेपूट सूपमध्ये शिजवण्यात आली, आणि मगरीला विस्तवावर भाजण्यात आले, काही तुकडे केळीच्या पानांमध्ये गुंडाळले होते ज्यांना जमिनीखाली शिजवण्यात आले.’ तसेच ‘ही एक मोठी पारंपारिक मेजवानी होती, जे खाऊन तेथील लोक तृप्त झाले,’ असेही मॅकब्राइड म्हणाले.
Killing Crows: दहा लाख भारतीय कावळ्यांना ठार मारण्याचा प्लान, का उठले सरकार जीवावर?
कमांडर कायली अँडरसन यांनी रहिवाशांना सजग केले आहे. त्या म्हणाल्या, ‘मगर रहिवाशांच्या सुरक्षेसाठी मोठा धोका निर्माण करू शकतात. पार्क्स आणि वाइल्डलाइफ, आमचे पोलिस कर्मचारी आणि रहिवासी यांच्यातील अखंड सहकार्याबद्दल धन्यवाद, आम्ही मोठ्या खाऱ्या पाण्याच्या मगरीला सुरक्षितपणे बाहेर काढू शकलो आणि समुदायातील रहिवाशांची सुरक्षा अबाधित ठेवू शकलो.

नुकत्याच आलेल्या पुरानंतर उत्तरेकडील प्रदेशात मगरींची संख्या वाढली आहे, विशेषत: ऑस्ट्रेलियाच्या पश्चिम भागात तर पुरामुळे अनेक मगरी विस्थापित झाल्या होत्या, ज्यामुळे त्या निवासी वस्तीजवळ नजरेस पडत होत्या. सामान्यत: खाऱ्या पाण्याची मगर सहा मीटर (२० फूट) आणि वजनाने एक टनपर्यंत वाढू शकते आणि ती काहीही खाऊ शकते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.