Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मोदी सरकारला अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागणार
दरम्यान, राहुल गांधी यांनी नुकतीच फायनान्शियल टाइम्सला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत राहुल गांधी म्हणाले की,”अनपेक्षित निवडणुकीच्या निकालानंतर भारतातील राजकीय परिस्थितीमध्ये मोठा बदल झाला आहे. पंतप्रधान मोदींच्या सरकारला आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागेल, तसेच भाजपच्या खासदारांची संख्या कमी आहे. त्यामुळे एक छोटीशी गडबड सरकारला अडचणीत आणू शकते.”
एनडीएमधील काही लोक आमच्या संपर्कात
राहुल गांधी पुढे म्हणाले की,” आत्ता स्थापन झालेल्या मोदी सरकारमध्ये मोठ्याप्रमाणात ‘असंतोष’ आहे. त्यामुळे एनडीएतील काही लोक आमच्या संपर्कात आहेत, लोकसभा निवडणुकीदरम्यान मोदींनी धार्मिक तणावाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी भारतातील मोठ्या मुस्लिम अल्पसंख्याकांना ‘घुसखोर’ म्हटले आहे.”
10 वर्षे आयोध्येच्या नावाने प्रचार केला त्याच आयोध्येने नाकारले
राहुल पुढे म्हणाले की, “आम्ही पाठीमागे हात बांधून लढलो. भारतीय जनतेला, गरीब जनतेला, त्यांना नेमके काय करायचे आहे हे माहीत होते. न्यायव्यवस्था, प्रसारमाध्यमे, संस्थात्मक संरचना हे सर्व विरोधकांसाठी बंद होते. त्यांनी गेली 10 वर्षे अयोध्येच्या मुद्द्यावर प्रचार केला परंतु त्यांना अयोध्येने नाकारले.
फायनान्शिअल टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय राजकीय विश्लेषकांनी एनडीए आघाडीच्या स्थिरतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. यंदा एनडीए आघाडी कमकुवत असून सत्ता टिकवण्यासाठी भाजपला छोट्या मित्रपक्षांवर अवलंबून राहावे लागणार आहे असं मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.