Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील मतदान ३० मे रोजी झालं. त्या दिवशी शुक्रवार होता. संध्याकाळी मतदान संपल्यानंतर एक्झिट पोल आले. जवळपास सगळ्याच एक्झिट पोल्सनी भाजप स्वबळावर बहुमताचा आकडा ओलांडणार असल्याचा अंदाज वर्तवला. त्यानंतर १ जूनला (सोमवार) शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. २ जूनला निवडणुकीचा निकाल लागला. भाजप बहुमतापासून दूर राहिला. त्यानंतर शेअर बाजारात मोठी पडझड झाली.
एक्झिट पोल्सच्या माध्यमातून शेअर बाजारात निर्माण करण्यात आलेली तेजी म्हणजे मोठा घोटाळा असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. त्यांनी या प्रकरणाची संयुक्त संसदीय चौकशी करण्याची मागणी केली. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना नरेंद्र मोदी, अमित शहा, निर्मला सीतारामन यांच्याकडून शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला होता. आता शेअर्स खरेदी करा. ४ जूनला निकालानंतर त्यांच्या किमती वाढलेल्या असतील, असं सरकारमधील प्रमुख नेते सांगत होते. पण ४ तारखेला लोकांनी कोट्यवधी रुपये गमावले. त्यामुळे या सगळ्याची चौकशी करण्यात यावी, असं राहुल गांधी म्हणाले होते.
लोकसभा निवडणूक लढताना राहुल यांनी दाखल केलेल्या शपथपत्रात त्यांच्याकडे असलेल्या शेअर्सची माहिती आहे. १५ मार्चला दाखल केलेल्या शपथपत्रात २५ कंपन्यांच्या शेअर्सची माहिती आहे. त्यावेळी त्यांचं मूल्य ४.३० कोटी रुपयांच्या घरात होतं. ४ जूनला निवडणूक निकालानंतर शेअर बाजारात पडझड झाली. त्यात राहुल गांधींचं २० लाखांचं नुकसान झालं. पण मोदींनी एनडीए सरकार स्थापन करताच बाजार सावरला. त्यामुळे राहुल गांधींच्या पोर्टफोलिओतील शेअर्सचं मूल्य ३१ लाखांनी वधारलं. ४ जूनपासून राहुल यांचा पोर्टफोलिओ साडे सात टक्क्यांनी वाढला आहे.
सुपरजित इंजिनीयरिंग कंपनीचे ४ हजार ४८ शेअर्स राहुल यांच्याकडे आहे. त्यांचं मूल्य १६.६५ लाख रुपये आहे. गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअर्सनी ३५ टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. राहुल यांच्याकडे पिडीलाईट, बजाज फायनान्स, नेस्ले इंडियाचेही शेअर्स आहेत. पिडीलाईटनं गेल्या १० दिवसांत १.५%, बजाज फाईनान्सनं १२.८% आणि नेस्लेनं ४.५% इतका परतावा दिला आहे.