Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

PadhAI App : एआय अँपला २०० पैकी १७० गुण! अवघ्या ७ मिनिटांत सोडवला यूपीएससीचा संपूर्ण पेपर

11

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित ‘पढाई’ (PadhAI) या अँपने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) २०२४च्या प्राथमिक परीक्षेत २०० पैकी १७० गुण मिळवले आहेत. या अँपने हा संपूर्ण पेपर अवघ्या ७ मिनिटांत सोडवला. या परीक्षेत सरासरी १०० पेक्षा कमी गुणांचा सामान्य स्कोअर असतो. मात्र, या अँपने त्यापेक्षा अधिक गुण मिळवले.

कोणी केली निर्मिती?

आयआयटीमधील विद्यार्थ्यांनी ‘पढाई’ अँप विकसित केले आहे. ‘यूपीएससी’ची प्राथमिक परीक्षा झाल्यानंतर रविवारी या अॅपने शिक्षणक्षेत्रातील प्रमुख पाहुणे, यूपीएससी परीक्षार्थी, पत्रकार यांच्या उपस्थितीत दिल्लीतील ‘द ललित’ हॉटेल येथे हा पेपर सोडवला.

Vegetables Price : भाज्यांचा तोरा कायम! आवक वाढूनही भाज्या महाग? जाणून घ्या आजचे दर काय?

किती वेळ लागला?

‘पढाई’ अॅपने यूपीएससी प्राथमिक परीक्षेचा पेपर अवघ्या सात मिनिटांत सोडवल्याचे कंपनीने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. ivestream.padhai.ai आणि यूट्यूबवर या प्रात्यक्षिकाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.

उत्तरांची तुलना

‘पढाई’ अॅपने दिलेल्या उत्तरांची ‘ओपन एआय’, ‘मायक्रोसॉफ्ट’, ‘गुगल’ या बड्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या एआय मॉडेलशी तुलनाही करण्यात आली. त्यासाठी आघाडीच्या कोचिंग क्लासच्या उत्तरतालिकांचा वापर करण्यात आला.

१० वर्षांतील उच्चांकी गुण

यूपीएससी परीक्षेमध्ये गेल्या १० वर्षांतील हा उच्चांकी स्कोअर आहे. आम्ही घेतलेला उपक्रम हा गेल्या काही वर्षांतील पहिलाच असावा. परीक्षेतील पेपर वेगाने व अचूकपणे सोडविण्याच्या स्पर्धेत काही शैक्षणिक संस्थांमध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम नियमतपणे घेतले जातील, असे ‘पढाई’चे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेय मंगलम यांनी सांगितले.

अॅपचा वापर काय?

‘पढाई’ हे शैक्षणिक अॅप असून, यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी त्याचा वापर केला जातो. गुगल प्ले स्टोअरवर हे अॅप उपलब्ध आहे. यामध्ये एआय आधारित विविध सुविधा आहेत. त्यामध्ये बातम्यांचे सारांश, स्मार्ट पीवायक्यू सर्च, शंका निरसन, उत्तरांचे स्पष्टीकरण, पुस्तकांचे सारांश यांचा समावेश आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.