Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
विश्वम म्हणाले, ‘डाव्या लोकशाही आघाडीमध्ये वायनाडची जागा भाकपला सुटलेली आहे. भारतीय जनता पक्षाला फायदा होईल, अशी कोणतीही संधी भाकप देणार नाही. त्यामुळे आम्ही नि:संशय उमेदवार देणार आहोत. काँग्रेसला जर वायनाडची जागा मोकळी करायची होती, तर राहुल गांधींसारख्या प्रमुख नेत्याने तेथून निवडणूक लढविण्याची गरज नव्हती.’
‘काँग्रेसने शत्रू ठरविण्याची गरज’
‘डावे पक्ष की, फॅसिस्ट पक्ष यांच्यापैकी सर्वांत मोठा शत्रू कोण आहे, ते काँग्रेसने ठरविण्याची गरज आहे,’ असे मत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) नेते अॅनी राजा यांनी मंगळवारी येथे व्यक्त केले. वायनाडमधून निवडून आलेल्या राहुल गांधी यांनी जागा रिकामी केल्यानंतर प्रियांका गांधी-वद्रा यांना काँग्रेसतर्फे उमेदवारी देण्यात आली आहे. त्यावर राजा यांनी टीका केली. राजा यांनी राहुल यांच्याविरोधात लढत दिली होती.
काँग्रेसकडून फसवणूक : भाजप
काँग्रेसकडून वायनाडच्या नागरिकांची फसवणूक झाली आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाने मंगळवारी येथे केला. प्रियांका गांधी-वद्रा यांच्या उमेदवारीवर पक्षाचे केरळ प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन आणि ज्येष्ठ नेते व्ही. मुरलीधरन यांनी टीका केली. सुरेंद्रन यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात लढत दिली होती. ‘आता कदाचित प्रियांका यांचे पती रॉबर्ट वद्रा हेही पलक्कड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरू शकतील,’ अशी उपरोधिक टीकाही त्यांनी केली.
राहुल गांधींचा अपेक्षित निर्णय
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अपेक्षेनुसार रायबरेलीतील खासदारकी राखण्याचा निर्णय घेतला असून, केरळमधील वायनाड मतदारसंघातील खासदारकीचा ते राजीनामा देणार आहेत. वायनाडमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीत राहुल यांची बहीण, काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी पक्षातर्फे निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमवारी माध्यमांना ही माहिती दिली.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी हे रायबरेली (उत्तर प्रदेश) आणि वायनाड (केरळ) लोकसभा मतदारसंघांतून विजयी झाले होते. नियमानुसार त्यांना यातील एका जागेचा राजीनामा द्यावा लागणार आहे. यावर विचारविनिमय करण्यासाठी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची खर्गे यांच्या निवासस्थानी सोमवारी बैठक झाली. या बैठकीस काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी-वड्रा, काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आदी नेते उपस्थित होते.