Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

ग्लॅम अप फेस्ट २०२४: फ्लिपकार्टने आयोजित केला सौंदर्यप्रसाधनांचा सर्वांत मोठा महोत्सव

11

फ्लिपकार्टने बहुप्रतिक्षित ग्लॅम अप फेस्ट हा महोत्सव मुंबईतील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे १४ जून २०२४ला पार पडला. ग्लॅम अप हा सौंदर्यप्रसाधनांचा सगळ्यात मोठा उत्सव होता. या महोत्सवात ३५०० हून अधिक ब्युटी इन्फ्ल्युएन्सर्सनी भाग घेतला आणि ७० पेक्षा अधिक सर्वोत्कृष्ट ब्रँड्स तिथे होते. ग्लॅम अप फेस्टमुळे लाईफस्टाईल इन्फ्ल्युएन्सर्सना एक मोठं व्यासपीठ मिळालं. त्याचा वापर करून ते ब्युटी आणि लाईफस्टाईल उत्पादनं सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या फॉलोअर्सपर्यंत पोहोचवलं.

सेलिब्रिटी इन्फ्लुएन्सर अवनीत कौरने व्हर्च्युअल ट्राय ऑन लुक्स ची ओळख करून दिली. सिद्धांत चतुर्वेदीने रिबॉक फ्रॅग्नन्स लाँच केलं. ताहा शाह ने वाईल्ड स्टोन परफ्युम तर अदाह शर्मा ने सिक्रेट टेम्पटेशन फ्रॅग्ननन्स लाँच केलं. इश्क विश्क ची टीम रोहित सराफ, पश्मिना रोशन, जिब्रान खान आणि नालिया ग्रेवाल यांनी या इव्हेंटमध्ये रंग भरले. साना खान, डेझी एझी, क्रितिका डागर, पियुष साहू, वैभव अरोरा यांनी तिथे वेगवेगळ्या उपक्रमात सहभाग घेतला. तसंच मेकओव्हर बूथ, नेल बार्स, व्हर्च्युअल ट्राय ऑन, फ्लिपकार्ट आयरिस इंटरॅक्टिव्ह बूथ अशा विविध उपक्रमात भाग घेतला.

फ्लिपकार्टच्या ग्लॅम अप फेस्टमध्ये स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय ब्रँड एकाच छताखाली उपलब्ध झाले. या महोत्सवात तापसी पन्नू, सिद्धांत चतुर्वेदी, रोहित सराफ, अदा शर्मा, आणि पश्मिना रोशन यांच्यासारखे भारतातील. लोकप्रिय सेलिब्रिटींनी उपस्थिती नोंदवली. सेलिब्रिटीज आणि इन्फ्ल्युएन्सर्स विविध ब्रँड बुथमध्ये जाऊन फ्लिपकार्टच्या एआर आणि व्हीआर यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून व्हर्च्युअल ट्राय ऑन, व्हीडिओ कॉमर्स, स्किन अनालायझर्स, या साधनांच्या वापर करून उत्पादनांची माहिती घेतली. त्यामुळे शॉपिंगचा अनुभव आणखी समृद्ध झाला.

या महोत्सवात लॉरियल, लॅकमे, मेबिलिन, शुगर कॉस्मॅटिक्स, मामाअर्थ, रिबॉक, रेव्हलॉन, न्युट्रोजिना, आणि सेटाफिल या ब्रँड्सचे एक्सपिरेन्शिअल झोन होते. त्याच्या माध्यमातून ते नवीन लाँच झालेली उत्पादनं, ठेवणीतली उत्पादनं आणि विविध डील्स ग्राहकांना बघायला मिळाली. १४ जूनला दिवसभर हा महोत्सवात नवीन ब्रँड लाँच, इंटरॅक्टिव्ह अक्टिव्हिटीझ, डेमो, प्रॉडक्ट ट्रायल्स, तसेच फोटो आणि व्हीडिओ स्टेशन्स होते.

या महोत्सवाला फ्लिपकार्टचे ज्येष्ठ अधिकारीही उपस्थित होते. एफएमसीजी आणि जनरल मर्चंटाईजचे प्रमुख मंजरी सिंघल, कस्टमर एक्सपिरियन्स अँड रिकॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि सप्लाय चेनचे प्रमुख हेमंत बद्री, तसेच चीफ प्रॉडक्ट आणि टेक्नॉलॉजी ऑफिसर जेयन्द्रन वेणुगोपाल यांचा समावेश आहे. ब्युटी आणि पर्सनल केअर इंडस्ट्री याबद्दल ते अधिक माहिती दिली.

अत्याधुनिक तंत्रज्ञान, भारतभर सप्लाय चेनचे नेटवर्क यांमुळे सौंदर्यप्रसाधन क्षेत्रात फ्लिपकार्ट नवे आयाम प्रस्थापित करत आहे. ग्लॅम अप शॉपिंगचा मोठा उत्सव आहे. त्यामुळे ब्युटी, मेकअप, ग्रुमिंग या क्षेत्रात फ्लिपकार्ट कायमच आघाडीवर असल्याचे सिद्ध झाले.

या महोत्सवानंतर ग्लॅम अप सेल १४ ते १७ जून दरम्यान पार पडला. या सेलमध्ये सौंदर्यप्रसाधनांवर चांगल्या ऑफर्स मिळाल्या. या सेलमुळे किफायतशीर दरात त्यांची आवडती उत्पादनं हवी त्या ठिकाणी ग्राहकांना मिळाली.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.